औरंगाबाद : प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या जलजीवन मिशनमधून जिल्ह्यातील ३०६० अंगणवाड्यांसह १५९६ शाळांना नळाद्वारे पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन केले जात आहे. पुढील शंभर दिवसांत या जोडण्या लोकसहभागातून करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत.
जिल्ह्यात एकूण ३२५० अंगणवाड्या असून त्यापैकी १९० ठिकाणी नळकनेक्शन जोडली गेली, तर ३०५६ शाळांपैकी १५६८ शाळांत नळजोडणी उपलब्ध आहे. शाळा अंगणवाड्यांना जलजीवन मिशनमधून नळ जोडणी व पाण्याची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असून जिथे नळाने शक्य तिथे नळाद्वारे, आवश्यक तिथे पंप बसवून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास जलजीवन मिशनमधून निधी मिळेल. मात्र, त्यासाठी गावकऱ्यांना १० टक्के लोकवर्गणी भरावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये १०० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
---
एकूण अंगणवाड्या - ३२५०
नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या - ३०६०
---
तालुकानिहाय आढावा
तालुका - अंगणवाड्या - नळजोडण्या नसलेल्या अंगणवाड्या
औरंगाबाद - ४६४ - ४०८
गंगापूर- ४९०-४३६
कन्नड -४९२-४८२
खुलताबाद-१२३-९१
पैठण -४६२-४६०
फुलंब्री -२५९-२४९
सिल्लोड -५०७-४९३
सोयगाव -१५३-१४५
वैजापूर -३००-२९६