शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे महिनाभरात ३० रुग्ण; साडेचार हजार ठिकाणी डासअळींची उत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:39 IST

महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली.

औरंगाबाद : पावसाच्या विश्रांतीबरोबर शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूने डोके वर काढले आहे. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. औरंगाबादेत १८ रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या महिनाभरात मोजके दिवस पाऊस पडला. त्यातून ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला आणि जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडला.

जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या गेल्या ७ महिन्यांत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळले होते. पावसामुळे रुग्णसंख्या महिनाभरात दुपटीने वाढली. गेल्या महिनाभरात ३० जणांना डेंग्यूची लागण झाली. यामध्ये ग्रामीण भागांत १२, तर औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत १८ रुग्ण सापडले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता हा आकडा मोठा असल्याची शक्यता आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यावर आरोग्य विभागातर्फे भर दिला जातो; परंतु शहर आणि ग्रामीण भागामध्ये आढळून येणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाहता हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात महिनाभरात ४ हजार ४३१ ठिकाणी डासअळींची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. २६९ ठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट करण्यात आली, तर ४ हजार १६२ ठिकाणचे पाणी रिकामे करून डासअळी नष्ट करण्यात आली. डास प्रतिबंधात्मक उपायाबरोबर आठवड्यातून किमान एक दिवस  भांडी कोरडी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावीपाऊस पडून गेल्यानंतर डास उत्पत्तीने डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. पैठण येथे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे; परंतु तो डेंग्यूचा रुग्ण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. नागरिकांनीही पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी