शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 13:20 IST

डायऱ्यांमध्ये धक्कादायक माहिती, एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी

- राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेत विद्यमान आमदार, जिल्हा परिषद सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोडच्या तीन डायरीत आढळल्या आहेत. डायरीत नोंद असलेल्या ३०० नावांच्या व्यक्तींचा हिशेब ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक जुळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिडकीन पोलीस ठाण्यात दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २१ जानेवारी रोजी दिली होती. त्या प्रकरणात ३०:३० योजना घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोड याच्यासह तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष राठोड यास ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने कोठडीत दिलेल्या माहितीनुसार नातेवाइकाकडे लपवलेल्या तीन डायऱ्या पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या डायऱ्यांमध्ये तब्बल ३०० गुंतवणूकदारांची नावे आहेत. त्या सर्व गुंतवणुकीचा हिशेब पोलिसांनी केला आहे. हा हिशेब तब्बल ३५० कोटीपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये औरंगाबाद शहरातील एक पेट्रोलपंप चालक, कंत्राटदाराने सुरुवातीला ६ कोटी, दुसऱ्या वेळी ७ कोटी रुपये योजनेत गुंतवले आहेत. त्या गुंतवणुकीचा परतावा तीन टप्प्यात मिळाला आहे. त्या परताव्याची नोंद ३० लाख, ७० लाख आणि १ कोटी रुपये असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय एका आमदाराने ७५ लाख रुपये गुंतवणूक केल्याची नोंद आहे. त्याशिवाय जि. प. सदस्याने शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून सव्वा तीन कोटी, एका नगरसेवकाने सव्वा दोन कोटी रुपये गुंतवले असल्याचेही डायऱ्यांमधील नोंदीत आढळले आहे.

परताव्यानंतर खोडल्या जात होत्या नोंदीसंतोष राठोड हा गुंतवणूकदारांच्या नोंदी पेन्शीलच्या साहाय्याने डायरीमध्ये करीत होता. संबंधितांना परतावा मिळाल्यानंतर त्या नोंदी खोडल्या जात असत. नव्याने गुंतवणूक झाल्यावर त्यात नोंद केली जात होती. ३० एप्रिल २०१३ रोजी योजना सुरू केली होती. तेव्हापासूनच्या नोंदी सापडल्यास हा घोटाळा हजार कोटींमध्ये जाण्याची शक्यताही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे३०:३० योजना घोटाळ्यातील गुंतवणुकीचा आकडा वाढला असल्यामुळे गुन्ह्याचा तपास बिडकीन पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस कोठडीत असलेला आरोपी संतोष राठोड याच्या डायऱ्यांमधील गुंतवणुकीच्या नोंदी ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातच गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

नातेवाइकांना प्लॉट देण्याचे आमिषआरोपी संतोष राठोड याने गुंतवणूक केलेल्या जवळच्या नातेवाइकांनी स्वत:च्या नावावर असलेले प्लॉट कोठडीतून बाहेर आल्यानंतर नावावर करून देतो, असे आमिष दाखवले आहे. त्याशिवाय इतर गुंतवणूकदारांनाही कोलकाता, नाशिक येथे केलेल्या गुंतवणुकीची विक्री करून पैसे परत केले जातील, असे आश्वासन एजंटामार्फत दिले आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदार पैसे परत मिळण्याच्या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद