लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील २८ हजार ८५२ विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन प्रणालीद्वारे नॅशनल पोर्टलवर भरली आहे. फ्रेशचे २१३१३ तर रिनिवलचे ७ हजार ५३९ अर्ज जिल्हा लॉग इनला प्राप्त झाले होते. पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू समाजातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृती योजनेचा लाभ दिला जातो. शिष्यवृत्ती विभागाचे जिल्हा समन्वयक एम. ए. सय्यद म्हणाले, विद्यार्थ्यांचे अर्ज नॅशनल पोर्टलवर आॅनलाईन पाठविण्यात आली असून फ्रेश विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर पात्र व अपात्र यादी जाहीर केली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर एका महिन्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. सदर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी १ हजार रूपये जमा केले जातात.
२८८५२ विद्यार्थ्यांची माहिती नॅशनल पोर्टलवर
By admin | Updated: June 17, 2017 23:52 IST