शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:26 IST

लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)अंतर्गत धरणांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामध्ये पाणी सोडण्यापासून ते पाणीपट्टी वसुलीची कामे होतात. गेल्या काही वर्षांत केवळ चालू पाणीपट्टीकडे कल आहे. जुन्या थकबाकीकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. मोठे, मध्यम आणि लघु अशा प्रकल्पांद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच राहत आहे. दरवर्षी मार्च अखेरीस वसुलीवर अधिक भर देण्यात येतो. गतवर्षी ४० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये ९५ टक्के म्हणजे ३८ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यामध्ये अनेक कारणांमुळे जुनी थकबाकी वसूल होत नसल्याची परिस्थिती आहे. चालू पाणीपट्टी वसुलीवरच भर दिला जात आहे. उद्योग आणि घरगुती वापरासाठी दिलेल्या पाण्याच्या शुल्काची (पाणीपट्टी) तुलनेत बरी आहे; परंतु सिंचनासाठीची पाणीपट्टी कमी प्रमाणात वसूल होत आहे. ‘कडा’ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद मनपाकडे ३१ मे अखेर तब्बल ६ कोटी १५ लाख ७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे. याबरोबर औद्योगिक वापरापोटी २ कोटी १२ लाख १९ हजार रुपयांची थकबाकी आहे. वाळूज एमआयडीसीकडे १२ कोटी ४७ लाख ४७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे.

टॅग्स :billबिलWaterपाणी