औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शास्त्रीय मूल्यांकनाआधारे दुष्काळ पाहण्याच्या सरकारी पद्धतीमुळे विभागातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्र सुदूर संवेदन यंत्रणे(एमआरसॅक)कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने जाहीर केली आहे. एमआरसॅक सॅटेलाईटनुसार काम करणारी यंत्रणा आहे. त्याआधारे शासनाने मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुसरी कळ लागू केली आहे. गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ त्याअंतर्गत विचारात घेतला गेला आहे.दुष्काळ मोजण्यासाठी कळ जी लावली आहे, ती तालुक्याला लावली आहे. तालुक्याच्या विवरणानुसार दुष्काळाचे मूल्यमापन कसे होणार. कोणत्याही तालुक्याचे उदाहरण घेतले, तर असे दिसते की, तेथे पाण्याखाली १० टक्के किती गावे असतील. उर्वरित ९० टक्के गावे कशी मोजणार याची अडचण येत आहे. मंडळनिहाय, सजानिहाय गावांची अवस्था पाहिली जात नाही. शितावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने दुष्काळाचे मूल्यमापन होत असल्याचा आरोप होतो आहे.दुष्काळाची दुसरी कळ अशीऔरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या तालुक्यांत गंभीर दुष्काळ आहे, तर कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी तालुक्यांत गंभीर, तर अंबाजोगई, केज, परळी, पाटोदा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगावमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे.जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी तालुक्यांत गंभीर स्वरूपाची, तर जाफ्राबाद, जालना आणि परतूर तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळ परिस्थिती आहे.परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती आहे, तर पालम, परभणी, सेलू तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यांत गंभीर, तर देगलूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.लातूर, उस्मानाबाद सुजलाम्...सुफलाम्लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे सुजलाम् सुफलाम् असल्याचे दुष्काळच्या दुसºया कळीनुसार सांगण्यात येत आहे. लातूरमधील शिरूर अनंतपाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर उस्मानाबादमधील लोहारा भागात तशीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:15 IST
: मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ
ठळक मुद्दे सरकारी जुमला : शास्त्रीय पद्धतीच्या मूल्यांकनामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता