शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 18:01 IST

सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़  यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर २७९ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली जाते जि. प. आरोग्य विभागात १ हजार २५ पैकी ७७४ पदे भरलेली आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर २७९ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली जाते; परंतु जि. प. आरोग्य विभागात १ हजार २५ पैकी ७७४ पदे भरलेली आहेत. सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़  यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे. 

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जिल्हा आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यामध्ये आरोग्य सहायिकांची ९४ पदे वाढली आहेत. काही पदे रिक्त आहेत. यासंदर्भात रिक्त पदांचा संवर्गनिहाय प्रस्ताव गेल्या वर्षी शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून भरतीच झाली नसल्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर आरोग्य सेवा दिली जात आहे. माता बालसंगोपन विभागात ४७ कंत्राटी आरोग्य सहायिकांच्या माध्यमातून कामकाज केले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये चोखपणे रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शस्त्रक्रिया शिबिरे पार पाडली जात आहेत. दवाखान्यांमध्येच प्रसूती झाली पाहिजे, यासाठी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो. याचा ग्रामीण भागात चांगला परिणाम दिसत आहे.  

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ११२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, यापैकी १११ पदे भरलेली आहेत. मात्र, १२ वैद्यकीय अधिकारी हे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुटीवर गेले आहेत, तर काही महिला डॉक्टर प्रसूती रजेवर आहेत. सध्या एकूण २९ डॉक्टर विविध कारणास्तव गैरहजर असल्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेवरचा ताण वाढला आहे. 

रिक्त पदांची संख्या अशीजिल्हा माता बालसंगोपन अधिकारी-१, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी-१, तालुका आरोग्य अधिकारी-१, वैद्यकीय अधिकारी गट अ- १, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद- १, जिल्हा विस्तार व मध्यम अधिकारी-१, आरोग्य सेवक पुरुष- १०६, आरोग्य सहायक पुरुष -१३, आरोग्य सेवक महिला- १६८, आरोग्य सहायक महिला-१०, औषध निर्माण अधिकारी-४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-२, युनानी हकीम-५, आरोग्य विस्तार अधिकारी-२, कुष्ठरोग तंत्रज्ञ- २७, अवैद्यकीय पर्यवेक्षक- ३ आदी़.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदHealthआरोग्यdoctorडॉक्टर