शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:19 IST

सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते. बुधवारी बँक उघडताच खातेदारांनी एकच गर्दी केली. आता पुन्हा गुरुवारी (दि.१७)‘पतेती’ असल्याने बँकांना सुटी राहणार आहे. मागील शुक्रवारी क्लिअरिंगसाठी दाखल केलेले सुमारे २५ हजार धनादेश सुट्यांमुळे अजूनही वटले नाहीत. रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात बँकेला सव्वाशे ते दीडशे कोटी पाठविल्याने सध्या पैशाची अडचण मात्र नाही.मागील आठवड्यात १२ आॅगस्टला दुसरा शनिवार, १३ आॅगस्टला रविवार असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर १४ रोजी सोमवारी बँका सुरू होत्या. पुन्हा मंगळवारी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी आली होती. अनेकांनी सुट्यांमुळे सहलीला जाण्याचे बेत आखले होते. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकाºयांनी सोमवारची सुटी टाकली होती. यामुळे त्यांना सलग चार दिवस सुट्या मिळाल्या. सुट्यांमुळे बँकाही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी एटीएममधून पैसे काढणे सुरू केले. परिणामी रविवारी शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे झाले. सोमवारी बँका सुरू होत्या, पण एटीएममध्ये पुरेशी रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे त्या दिवशी सायंकाळपर्यंत २५० पेक्षा अधिक एटीएममधील रक्कम संपली होती. एटीएममध्ये रक्कम नसल्याने अनेकांना मंगळवारी ध्वजवंदनानंतर सहलीला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांचेही तेथील एटीएम रिकामे झाल्याने हाल झाले.बुधवारी सकाळी बँका सुरू झाल्या तेव्हा काही मिनिटांतच काऊंटरसमोर रांगा लागल्या. मात्र, पगारी आठवडा संपल्याने कमीच गर्दी दिसून आली. काऊंटरवर खातेदारांना आवश्यक रक्कम मिळत होती. यात १०० व ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक होते.एका बँक अधिकाºयाने सांगितले की, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ११ आॅगस्टला एसबीआयला ९६ कोटी रुपये तर अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टला सर्व मिळून सुमारे दीडशे कोटी रुपये पाठविले. यामुळे शुक्रवारी बहुतांश एटीएममध्ये मुबलक पैसे होते. पण पैसे काढणाºयांची संख्या एवढी होती की, रविवारी एटीएम रिकामे झाले. शुक्रवारी सुमारे २५ हजार धनादेश बँकांमध्ये जमा झाले. ते आज सायंकाळपर्यंत वटविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सुटी आली आहे. त्यामुळे ज्यांनी मागील शुक्रवारी धनादेश बँकेत जमा केले, ते १८ रोजीच म्हणजे आठवडाभरानंतर संबंधितांच्या खात्यात जमा होतील. मात्र, ज्यांनी बुधवारी धनादेश जमा केले ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत वटविले जातील.