शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १४ मार्गांवर बुधवारपासून २५ स्मार्ट बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:44 IST

शहराच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२ कि.मी.साठी फक्त ५ रुपये प्रवास भाडेशहरालगतच्या खेड्यापाड्यांतूनही धावणार शहर बस

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून महापालिकेतर्फे स्मार्ट बससंदर्भात निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात येत होता. अखेर २३ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात शहरातील १४ मार्गांवर २५ बसेस धावणार असल्याची घोषणा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ट्विटरवर केली. त्यामुळे बसेस खरोखरच धावणार हे निश्चित झाले आहे. शहर बसचे प्रवास भाडेही अत्यंत कमी ठेवण्यात आले असून, दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील. शहराच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

 

दहा वर्षांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला होता. औरंगाबादकरांना शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास अ‍ॅपे, रिक्षाचालक प्रचंड लूट करीत असत. अवाच्या सव्वा पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता. स्मार्ट सिटी योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने तब्बल १०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २५ बस मनपाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पावर महापालिकेने स्मार्ट सिटीतील किमान ३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.

२३ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात २५ बसेस १४ मार्गांवर धावणार आहेत. पहाटे पाच वाजेपासून ही सेवा एस. टी. महामंडळ देणार आहे. रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना शहर बस उपलब्ध होईल, यादृष्टीने एस. टी. महामंडळाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहराबरोबरच वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, हर्सूल-सावंगी, चिकलठाणा, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई, हिंदुस्थान आवासपर्यंत बसेस धावणार आहेत.

काही जागा आरक्षितस्मार्ट बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.  एस. टी. महामंडळाप्रमाणे सर्व सवलती देण्यात आल्या आहेत. स्मार्ट बस ३२ आसनी असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन, अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादpassengerप्रवासी