शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

२२ हजार ७३ मतदारांनी वापरला ‘नोटा’

By admin | Updated: February 25, 2017 00:41 IST

जालना जिल्ह्यातून २२ हजार ७३ मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाचे (वरीलपैकी एकही नाही) बटण दाबून आपली नापसंती दर्शविली.

गजानन वानखडे जालनाजिल्हात जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितीच्या ११२ गणासाठी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातून २२ हजार ७३ मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाचे (वरीलपैकी एकही नाही) बटण दाबून आपली नापसंती दर्शविली.ग्रामीण भागासाठी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या जि.प. आणि पंचायत समितीची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही महत्त्चाची मानली जाते. ग्रामीण भागात करण्यात येणारी विकासाची संपूर्ण कामे जि.प. पं.स. समितीच्या माध्यमातूनच करण्यात येते. त्यातच शासनाने ग्रा.पं. थेट निधी देण्यात येत असल्याने पं.स. माध्यमातून ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी अनेकांना ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु आठही तालुक्यांतून २२ हजार ७३ मतदारबंधूंनी दिलेल्या उमेदवारांना नाकारल्याने काही उमेदवार काठावर निवडून आले तर, काहींना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.जि.प. पं.स. निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इ. पक्षांंनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. केंद्र शासनाने अचानक केलेल्या नोटाबंदीचा फटका सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला बसेल, असा तर्क काढण्यात येत होता. त्यातच सेना भाजपा युती तुटल्याने याची शक्यता जास्त वाढली होती. परंतु भाजपाने मुसंडी मारत जि.प. २२ आणि पं. स. ५४ जागा पटकावून सर्वच पक्षांना धक्का दिला. यात जालना तालुक्यातून ९ आणि १८ गणांसाठी झालेल्या जि.प. आणि पं.स.मतमोजणीत तालुक्यात ३ हजार ५१५ मतदारांनी नोटाला पसंती दिली. यात ९ गटात १५१० आणि १८ गटात २०१५, भोकरदन तालुक्यातील जि.प. ११ गटात १९२६ आणि पं.स. गणात २४६६, बदनापूर तालुक्यातील जि.प. ५ गटात ७३६, १० गणात ७९४, मंठा तालुक्यात ५ गटात ११२८, १० गणात १२८३, परतूर तालुक्यात ५ गटात ९३३, १० गटात ११२४, जाफराबाद तालुक्यात ५ गटात ६७० , १० गणात ९००, अंबड तालुक्यात ८ गटात ११७५, १६ गणात १८०५, घनसावंगी तालुक्यात ८ गटात १२४९, १६ गणात १३०२ मतदारांनी नोटाला पसंती देत उमेदवारांना नाकारले. यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक कमी बदनापूर तालुक्यातील मतदारांनी नोटाचा वापर केला. तर सर्वाधिक भोकरदन तालुक्यात नोटाचे बटण दाबून उमेदवारांना नाकारले.