शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’ पतसंस्थेतील २०२ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास लागेल वर्ष

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 20, 2023 12:33 IST

प्रशासकाने कारभार सांभाळल्यावर सुरू होणार कार्यवाही

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्व ठेवीदारांची झोप उडाली आहे. आपल्या मेहनतीचे लाखो रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सर्व सूत्र प्रशासक हाती घेणार असून त्यानंतर कर्ज वसुली, संपत्ती जप्तीच्या कारवाईला वेग येईल. मात्र, ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

२०१४ नंतर कायदा बदलला आणि पतसंस्थेला खाजगी ऑडिटरकडून ऑडिट करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आदर्श नागरी पतसंस्थेत दरवर्षी खाजगी ऑडिटरकडून ऑडिट केले जात होते. कर्ज वाटपातील घोळ, व्यवहारातील अनियमितता याबद्दल ऑडिटरने सहकार उपनिबंधक कार्यालयास कळविणे अपेक्षित होते; पण त्याचा थांगपत्ताही या सरकारी कार्यालयाला लागू दिला नाही. संशय आल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेचे २०१६ पासूनचे ‘टेस्ट ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. या ऑडिटच्या अहवालातून २०२ कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

२०१६ पासून खाजगी ऑडिटरने पतसंस्थेतील अवाजवी कर्ज देण्याची व कामातील अनियमिततेची माहिती उपनिबंधक कार्यालयाला दिली नाही. दडवून ठेवल्याने खाजगी ऑडिटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सूत्र प्रशासक हाती घेतील. त्यानंतर कर्जवसुली सुरू होईल. त्यानंतर पतसंस्थेची मालमत्ता सील करण्यात येईल, अध्यक्ष व संचालकांची मालमत्ताही जप्त करण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर या संपत्तीचा लिलाव होईल व त्यातून मिळालेली रक्कम ठेवीदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, यासाठी वर्ष लागू शकते. कर्जदार व बँकेच्या संचालक मंडळाची संपत्तीची माहिती असल्यास ठेवीदारांनी ती पोलिस किंवा सहकार उपनिबंधक कार्यालयात द्यावी. ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी विविध पातळीवर लढाई लढावी लागेल, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

संयम बाळगा, टोकाची भूमिका घेऊ नकाजिल्हा उपनिबंधक विभागही कायदेशीररीत्या एकेक पाऊल पुढे टाकत आहे. ठेवीदारांनी संयम ठेवावा. टोकाची भूमिका घेऊ नये.- डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरतजिल्हा उपनिबंधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरत आहेत. अनेक पतसंस्थांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. आदर्श नागरी पतसंस्था वगळता सध्या अन्य कोणत्याही पतसंस्थेच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद