शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

२० रानडुक्करे वाहनात भरून निघाले विक्रीस मुंबई, नाशिककडे; पाठलाग करून तिघे पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:07 IST

रानडुक्करांची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात वन विभागाने पाठलाग करून तिघांना पकडले

छत्रपती संभाजीनगर: परभणीवरून २० रानडुक्कर घेऊन मुंबई, नाशिकला विक्रीसाठी जाणाऱ्या तिघांना वनविभागाने पाठलाग करून रविवारी पहाटे पकडले.

पांढऱ्या रंगाचा मिनी टेम्पो (एम एच २२ ए एन ४३०७) केंब्रिज चौकातून संशयास्पदपणे वेगाने जाताना वनविभागाच्या गस्ती पथकाने पाहिले. वाहनातून एका डुकराचे तोंड बाहेर आल्याने पथकाचा संशय बळावला. वनपाल अविनाश राठोड, वनरक्षक एस.के. घुशिंगे, चालक आत्माराम तरटे यांना शंका आल्याने त्यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने वाहन सुसाट पळविणे सुरू केले. ते समृद्धी महामार्गाकडे जात असतांना पथकाने केंब्रिज ते कचरा पट्टी रोडवर पाठलाग करून १.३० वाजेच्या सुमारास पकडले. राजाराम गुंडीबा जाधव, कल्याण किसन बारहाते, धनराज शेषराव वंजारे यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही रानडुकरे परभणीतील जंगलातून खरेदी करून ते नाशिक येथील मनोरा व मुंबईत तस्करी करीत असल्याचे आरोपींच्या सांगण्यावरून लक्षात आले.

हे मोठे रॅकेट असल्याचा संशयपथकाने टेम्पो ताब्यात घेतला असून २० रानडुक्करांची सुटका केली. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी पथक मुख्य वनसंरक्षक लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाईसाठी नाशिक व मुंबईकडे रवाना केले आहे.

तिन्ही आरोपींना एफसीआर वन कोठडीरानडुक्करांची तस्करी करणाऱ्या तिन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता ३० एप्रिलपर्यंत वन कोठडी (एफसीआर) मिळाली . रानडुक्करांच्या तस्करीत कोणाकोणाचा सहभाग आहे?, किती दिवसांपासून ही तस्करी सुरू आहे याचा शोध वनविभाग घेत आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforest departmentवनविभाग