शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारांची लाच मागितली; पण घेतली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:01 IST

घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देमहावितरणचा अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

औरंगाबाद : घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. याप्रकरणी कार्यकारी अभियंता रामेश्वर नारायण सोनत यास लाचलुचपत प्रतिबंध पथकाने महावितरणच्या कार्यालयातच ताब्यात घेतले.तक्रारदार हे शेती करतात. महावितरणच्या भरारी पथकाने त्यांच्या राहत्या घराची अचानक पाहणी करून दोन्ही मीटरची तपासणी केली. ते मीटर फॉल्टी असून, फेरफार केल्याने तुम्हाला कमी बिल येत होते. आता दंडात्मक कारवाईत किमान पाच लाख रुपये रक्कम भरावी लागतील, असे मिल कॉर्नरच्या कार्यालयात बोलावून अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरारी पथकप्रमुख रामेश्वर सोनत यांनी सांगितले.रक्कम कमी करायची असल्यास ५० हजार रुपये लाचेची सरळ मागणी केली; परंतु फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधून तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने चाचपणी केली असता २० हजार रुपये लाच घेण्याचे स्पष्ट झाले.तक्रारदार व पथक लाचेची रक्कम घेऊन गेले असता त्याने स्वीकारण्यास नकार दिला असला, तरी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पथकाने केली कारवाईयावेळी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवळी, पोलीस नाईक भीमराज जिवडे, अश्वलिंग होनराव, दिगंबर पाठक, संतोष जोशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmahavitaranमहावितरण