शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नियमांकडे दुर्लक्ष भोवले; २० कृषी सेवा केंद्रांना ‘स्टॉप सेल’च्या नाेटीस

By बापू सोळुंके | Updated: June 10, 2023 19:24 IST

एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत.

औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदीची लगबग सुरू केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते विक्री केल्याचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० कृषी सेवा केंद्रांना तीन आठवडे माल विक्री थांबविण्याच्या (स्टॉप सेल)च्या नोटीस कृषी विभागाने बजावल्या.

बियाणे, खते आणि कीटकनाशकाची शेतकऱ्यांना नियमानुसार विक्री करावी. एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत. या नियमानुसार खते आणि बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांना पावती देणे, दुकानात उपलब्ध असलेल्या खतांची माहिती देणारा बोर्ड दर्शनी ठिकाणी लावावा, कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना जादा दराने माल विक्री करू नये, विक्री केलेल्या बियाणे आणि खताची नोंद रजिस्टरमध्ये करणे, ई-पॉसमध्ये खत विक्रीची नोंद करणे दुकानदाराला बंधनकारक आहे.

कृषी सेवा केंद्रचालक नियमांचे पालन करतात अथवा नाही, तसेच शेतकऱ्यांना बियाणे आणि खत विक्री करताना अडवणूक करतात का? याबाबतची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना केली आहे. या सोबतच तालुका कृषी अधिकारी, पंचायत तालुका कृषी अधिकारी यांनाही अचानक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत २० कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे आणि खत विक्रीचे रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आढळले. त्यामुळे या कृषी सेवा केंद्र चालकांना जिल्हा कृषी अधीक्षकांच्या निर्देशाने नोटीस बजावण्यात आल्या. तीन आठवडे हे दुकानदार त्यांच्याकडील मालाची विक्री करू शकणार नाहीत. ऐन हंगामात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईने कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.

दोन दुकानांचे परवाने होणार निलंबितजिल्ह्यातील दोन दुकानदारांना ऑफलाइन खत विक्री करणे महागात पडले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार कृषी सेवा केंद्र चालकांना खत विक्री करण्यासाठी ई-पॉस मशिन देण्यात आले आहे. या मशिनमध्ये नोंद केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या आधारकार्डची नोंद करूनच त्यांना खत विक्री करणे गरजेचे आहे. मात्र, दोन दुकानदारांनी ऑफलाइन खत विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाने सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद