शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीची रजा; अंमलबजावणी सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:33 IST

कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देमंदीचा काळ म्हणून रजारविवारपासून पाठविले रजेवर

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे तोट्यात आलेल्या एसटीने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कामगारांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. यावर पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.  एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार रजेवर पाठविण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. 

२० रजा पसंतीनुसार : एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० रजा देण्यात येतात. यातील निम्म्या रजा या मंदीच्या काळात देता येतात, तर उर्वरित २० रजा कर्मचारी पसंतीनुसार घेऊ शकतात. सध्या मंदीचा काळ असल्याने रजेवर पाठविणे क्रमप्राप्त असल्याचे मध्यवर्ती बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

रविवारपासून पाठविले रजेवर : मध्यवर्ती बसस्थानकातील २० कर्मचाऱ्यांना रविवारपासून रजेवर पाठविण्यात आले. अशाच प्रकारे प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. २० दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जित रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे, असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादstate transportएसटी