शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी

By स. सो. खंडाळकर | Updated: November 26, 2024 12:49 IST

यंदा फुलंब्रीहून अनुराधा चव्हाण व कन्नडहून संजना जाधव आल्या निवडून

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव अशा दोन महिला आमदार झाल्या आहेत. जिल्ह्यातील आजवरच्या महिला आमदारांचे प्रमाण फार मोठे नाही. पूर्वी चार महिला आमदार झाल्या. आता फुलंब्रीकन्नडमधून अनुक्रमे अनुराधा चव्हाण व संजना जाधव यांनी यश मिळवले.

१९५२ साली वैजापूरहून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आशाताई वाघमारे या आमदार म्हणून निवडून आल्या. वैजापूरहून दिवंगत विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतला पाटील याही आमदार बनल्या होत्या. तर १९६७ साली कॉ. करुणाभाभाी चौधरी या गंगापूरतून निवडून आल्या होत्या. रायभान जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव या १९९८ सालच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

यावेळी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत मिळून २२ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. त्यात औरंगाबाद पश्चिममधून पंचशीला जाधव (रिपब्लिकन बहुजन सेना), मनीषा खरात (स्वतंत्र), सुलोचना आक्षे (स्वतंत्र) यांचा समावेश होता. औरंगाबाद पूर्वमधून शीतल बनसोडे, झकेरिया शकिला नाजेखान पठाण, तस्नीम बानो इक्बाल मोहंमद व नीता भालेराव या चार महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. औरंगाबाद मध्यमधून कांचन जांबोटी या एकमेव महिलेने अर्ज भरला होता.

६ पैकी ३ मतदारसंघांत पाटी कोरी.....गंगापूर, फुलंब्रीकन्नड या ३ विधानसभा मतदारसंघांत ८ महिला उमेदवार निवडणूक लढवीत असून, वैजापूर, सिल्लोड आणि पैठण या ३ मतदारसंघांत यावेळी एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हती. गंगापूरमधून सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पार्टीच्या उमेदवार अनिता वैद्य व अपक्ष पुष्पा जाधव या दोन, तर फुलंब्रीमधून महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण आणि अपक्ष ॲड. अंजली साबळे (पानसरे) या दोन महिला उमेदवार उभ्या होत्या. सर्वाधिक ४ महिला उमेदवार कन्नड - सोयगाव विधानसभा मतदारसंघात होत्या. महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, बहुजन समाज पार्टीच्या रंजना जाधव, अपक्ष संगीता जाधव आणि मनीषा राठोड यांचा समावेश होता.

१३ निवडणुकांत फक्त १४ महिला उमेदवारजिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांत १९७२ ते २०१९ या कालावधीत विधानसभेच्या १३ निवडणुका झाल्या. यात फक्त १४ महिलांनी निवडणूक लढविली. त्यात १९९८ मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविलेल्या तेजस्विनी रायभान जाधव या एकमेव महिला विजयी झाल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkannad-acकन्नडphulambri-acफुलंब्री