शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मृत, बोगस नावांचा वापर करत रोहयो कामात २ कोटींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:38 IST

झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण १६ जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण १६ जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.झरी-वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीत रोहयोअंतर्गत ग्रामसुधार, स्वच्छता, पाणी पुरवठा व सिंचन विभागाने विविध काम कामे केली. संगनमताने कामे बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार झाल्याची तक्रार गोवर्धन सुदामसिंग चंदवाडे यांनी वरिष्ठ अधिकारी व पोलिसांत केली होती. परंतु सदरील प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने गोवर्धन चंदवाडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाने १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन सरपंच रेखाबाई ज्ञानेश्वर राऊत, सरपंच पती ज्ञानेश्वर विठ्ठल राऊत, तत्कालीन ग्रामसेवक आर. बी. गुुंजाळ, ग्रामरोजगार सेवक कल्याण महासिंग महेर, तत्कालीन पोस्टमन अशोक उत्तम गायकवाड, पोस्टमास्तर रमेश पांडुरंग सोनवणे, तत्कालीन तहसीलदार अनिता भालेराव, तत्कालीन पेशकार व वनपाल तसेच तत्कालीन कृषीसेवक व्ही. एच. पाटील, जि.प.सिंचनचे शाखा अभियंता राजेंद्र मधुकर अमृतकर, तत्कालीन गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, ठेकेदार काकासाहेब काशिनाथ लोंढे व सुभाष ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मतदार ६०० अन् बोगस जॉबकार्ड १,३६८झरी -वडगाव येथे मनरेगा अंतर्गत संगनमत करून शासकीय निधीचा अपहार करण्यासाठी संबधितांनी बोगस जॉबकार्ड बनविले. त्यात मृत, लोकांची काल्पनिक नावे, अपंग, अल्पवयीन व्यक्ती, बाहेरगावी राहणारे, वयोवृद्ध आदींच्या नावे अनेक जॉबकार्ड बनविले. गावाची मतदारसंख्या ६०० असताना १३६८ खोटे व बनावट जॉबकार्ड तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद