उस्मानाबाद : चोरून वीज वापरणार्या १८८ जणांना महावितरण कंपनीच्या पथकाने कारवाईचा जोरदार ‘शॉक’ देत ११ लाख १६ हजार रूपयांचा दंड केला आहे़ तर १२ जणांकडून ३१ हजाराचा दंड वसूल केला आहे़ महावितरणच्या उस्मानाबाद मंडल कार्यालयांतर्गत जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत़ महावितरण कंपनीच्या नावाने सतत कोणत्या न कोणत्या कारणाने ओरड सुरू असते़ चुकीचे वीजबिल असो अथवा तांत्रिक बिघाड, भारनियमन असो प्रत्येकवेळी ग्राहकांना वेगळाच ‘शॉक’ बसतो़ मात्र, उस्मानाबाद मंडल कार्यालयांतर्गत वीजचोरीचे वाढलेले प्रमाण पाहता अधीक्षक अभियंता पापडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागांतर्गत असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या पथकाने वीजचोरांविरूध्द धडक मोहीम हाती घेतली आहे़जानेवारी महिन्यात कलम १३५ प्रमाणे २४ वीजचोरांवर कारवाई करून १ लाख ५ हजाराचा, फेब्रुवारी महिन्यात ४५ 3वीजचोरांवर कारवाई करून ७ लाख ७३ हजाराचा, मार्च महिन्यात १७ वीजचोरांवर कारवाई करून ७३ हजार तर एप्रिल महिन्यात ११ वीजचोरांवर कारवाई करून ३७ हजार रूपयांचा दंड केला आहे़ यात १२ जणांकडून ३१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ तसेच कलम १२६ प्रमाणे अनाधिकृतरित्या वीजेचा वापर करणार्या ९१ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे़ यामध्ये जानेवारी महिन्यात ४१ जणांवर कारवाई करून ३५ हजार, फेब्रुवारी महिन्यात १६ जणाविरूध्द कारवाई करून ३२ हजार, मार्च महिन्यात २८ जणाविरूध्द कारवाई करून ३१ हजाराचा, एप्रिल महिन्यात सहा जणाविरूध्द कारवाई करून २० हजार रूपयांचा दंड केला़ (प्रतिनिधी) ३१ हजारांचा दंड वसूल महावितरणच्या पथकाने कलम १३५ अन्वये ९७ वीजचोरांवर कारवाई करून ९ लाख ९८ हजाराचा दंड केला आहे़ यात जानेवारी महिन्यात ७ ग्राहकांकडून १९ हजार, फेब्रुवारी महिन्यात २ ग्राहकांकडून ८ हजार, मार्च महिन्यात तीन ग्राहकांकडून ४ हजार रूपये असा एकूण ३१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे़
१८८ जणांना वीज कंपनीचा ‘शॉक’
By admin | Updated: May 7, 2014 00:38 IST