नांदेड : जिल्ह्यात जूनच्या प्रारंभापर्यंत टँकरची संख्या १८ वर पोहोचली आहे़ यात सर्वाधिक ७ टँकर मुखेड तालुक्यात आहेत़ जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि त्यानंतर सुरूच असलेल्या अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट यंदा गंभीर झाले नाही़ तरीही टंचाईचे तालुके म्हणून ओळखल्या जाणार्या कंधार, लोहा, मुखेड, भोकर तालुक्यात पाणीटंचाईचे चटके काही गावांत बसत आहेत़ त्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे़ जिल्ह्यातील ६ गावे आणि १९ वाडी तांड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जिल्ह्यात प्रशासनाने २ ठिकाणी पूरक नळयोजनांनाही मान्यता दिली आहे़ तर १३ विंधन विहिरींचे कामे पूर्ण झाली असून प्रशासनाने आतापर्यंत एकूण ३१६ विंधन विहिरींना मान्यता दिली आहे़ टँकरची सर्वाधिक संख्या ही मुखेड तालुक्यात आहे़ येथे ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ तर कंधार तालुक्यात ५, लोहा ४ आणि भोकर व किनवट तालुक्यात प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू
By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST