शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

इसारवाडीतील सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी कृषी विभागाकडून १७ कोटी २२ लाखांची मागणी

By बापू सोळुंके | Updated: January 11, 2024 11:20 IST

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात ४० हजार ८८६ हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे मंजूर झालेल्या सिट्रस इस्टेट उभारणीसाठी कृषी विभागाने शासनाकडे १७ कोटी २२ लाखांचा निधी मागितला आहे. या निधीतून प्रशासकीय इमारत, उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका, अवजारे बँक, माती, पाणी चाचणी प्रयोगशाळेसह विविध बाबींवर खर्च प्रस्तावित करण्यात आला.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात ४० हजार ८८६ हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून मोसंबी बागांची लागवड सतत वाढत आहे. विद्यमान मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांची संख्या ३१ हजार ६४० हून अधिक आहे. मराठवाड्यात मोसंबीवर संशोधन व्हावे, तसेच शेतकऱ्यांना उच्च प्रतीची मोसंबीची कलमे मिळावी आणि मोसंबी बागायतदारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मागणीची दखल घेत गतवर्षी राज्य सरकारने पैठण येथे सिट्रस इस्टेट उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र पैठण येथील जमीन या प्रकल्पासाठी योग्य नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यानंतर शासनाने कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पैठण येथील सिट्रस इस्टेट हा प्रकल्प इसारवाडी येथे उभारण्यास मंजुरी दिली.

हा प्रकल्प उभारणीसाठी कृषी अधिकारी रामनाथ कार्ले यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. सुरुवातीला सिट्रस इस्टेट उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला प्राप्त झाला होता. इमारत बांधकामासाठी १९ कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. सिट्रस इस्टेट प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने १७ कोटी २२ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

या कामावर होणार १७ कोटींचा खर्चया निधीतून उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटिका स्थापन करणे, प्रशासकीय कार्यालयाची इमारतीसाठी ४ कोटी १० लाख रुपये, कलेक्टशन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंग, साठवणूक युनिट स्थापना करण्यासाठी ३ कोटी ९१ लाख रुपये, अवजारे बँकेच्या स्थापनेकरिता दीड कोटी रुपये, माती, पाणी, ऊती व पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जीवाणू खते उत्पादन करण्यासाठी दीड कोटी रुपये, संशोधन व निवड पद्धतीने संत्रा वाण विकसित करण्यासाठी १५ लाख रुपये, खेळते भांडवल यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, शेतकरी प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाकरिता २५ लाख रुपये आणि संकीर्ण खर्च म्हणून १ कोटी ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद