शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

१६४ कंपन्या, ६० हजार कोटींची उलाढाल; छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीची जगभर भरारी

By बापू सोळुंके | Updated: December 5, 2023 14:35 IST

औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ३० वर्षांपूर्वीची ओळख आजही कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर : ५० ते ६० हजार कोटींची उलाढाल असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील फार्मा इंडस्ट्रीमध्ये १६४ लहान मोठ्या औषधी कंपन्या कार्यरत आहेत. यातील विविध नामांकित दहाहून अधिक कंपन्यांच्या औषधांना अमेरिकन एफडीएची मान्यता असल्याने येथे उत्पादित होणाऱ्या औषधींची जगभरात निर्यात होते.

निर्यात सुमारे १२ हजार कोटींपर्यंत आहे. औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ३० वर्षांपूर्वीची ओळख आजही कायम आहे. येथील चिकलठाणा, वाळूज, पैठण एमआयडीसीनंतर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि आता वेगाने विकसित होत असलेला ऑरिक सिटीचा दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उद्योग जगतासाठी आशेचा किरण आहे. मराठवाड्यातील १६४ फार्मास्युटिकल कंपन्यांची एकूण वार्षिक उलाढाल ५० ते ६० हजार कोटी रु. आहे. कोविड महामारीच्या काळात येथील सर्व उद्योग ठप्प असताना केवळ औषध निर्माण क्षेत्रात कार्यरत कंपन्या सुरू होत्या. याचा फायदा येथील इंडस्ट्रीजसोबतच कामगारांनाही झाला. येथील फार्मा इंडस्ट्रीमध्ये विविध उद्योजकांनी सुमारे ५० ते ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यातील अनेक कंपन्या येथे ४० वर्षाहून अधिक काळापासून व्यवसाय करीत आहेत. या कंपन्यांना कच्चा माल देशातील विविध कानाकोपऱ्यातून आणि शेजारील देशातून आयात करण्यात येतो.

सुमारे १२ हजार कोटींची निर्यातसीएमआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज एमआयडीसीमधील दहाहून अधिक फार्मास्युटिकल कंपन्या अमेरिकन एफडीए मान्यताप्राप्त आहेत, तर काही कंपन्यांच्या औषधींना अमेरिकन एफडीएने मान्यता दिलेली आहे. यामुळे या कंपन्यांची औषधी अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांत निर्यात होते. दरवर्षी ही निर्यात सुमारे १० ते १२ हजार कोटी आहे.

फार्मा क्लस्टरचा प्रस्ताव डीएमआयसीकडे पडूनडीएमआयसीमध्ये स्वतंत्र फार्मा क्लस्टर असावे, अशी येथील फार्मास्युटिकल कंपन्यांची मागणी आहे. औषधी कंपन्या आणि त्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी एक स्वतंत्र क्लस्टर असावे, असे झाल्यास येथे आणखी नवीन फार्मास्युटिकल कंपन्या येतील. तसेच येथील कंपन्याही त्यांचा विस्तार करतील. याचा लाभ येथील उद्योगजगताला होईल, यासाठी सीएमआयएने ऑरिक प्रशासनाला फार्मा क्लस्टरसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र अद्याप हा प्रस्ताव मंजूर नाही.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी