शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 12:42 IST

मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे

ठळक मुद्दे १ हजारच्या आसपास टँकरने विभागातील ८०० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे, तर १ हजारच्या आसपास टँकरने विभागातील ८०० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १६ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील ५०० गावांतील सुमारे १० लाख ५० हजार नागरिकांना ६०६ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला त्रासदायक ठरला आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख, तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. जलप्रकल्पांतील पाण्याचे यंदा मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे, त्यामुळे विभागात ट़़ँकरची संख्या वाढत आहे.

औरंगाबाद सर्वाधिक तहानलेलेऔरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १२० च्या आसपास टँकर सुरू आहेत. औरंगाबाद शहरालगतच्या दीड ते २ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण