शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामांत १६ कोटींचा गैरव्यवहार प्रकरण ‘एसीबी’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:21 IST

पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

गेल्या महिन्यात शाखा अभियंता बी. बी. जायभाये, बोईनवाड आणि पठाण यांचे या कामांप्रकरणी निलंबन करण्यात आले होते. एसीबीकडे हे प्रकरण गेल्यामुळे चौकशीअंती बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पैठण तीर्थक्षेत्र प्राधिकरणासाठी शासनाने दिलेल्या २०० कोटींपैकी १६ कोटींतून करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांत संबंधित अभियंत्यांनी चालढकल करीत देखरेख केली. परिणामी हे रस्ते पूर्णत: उखडले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील कामांची पाहणी केली होती. पाच कंत्राटदारांपैकी ३ कंत्राटदारांनी केलेल्याकाँक्रीटच्या रस्त्यांना पूर्णत: तडे गेले. ही कामे निकृष्ट झाल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी शाखा अभियंत्यांवर १०  ठपके ठेवले.

कामाचे सुपरव्हिजन योग्य रीतीने झाले नाही. त्या अनुषंगाने तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला. अधीक्षक अभियंत्यांकडे त्या  तिघांनीही नोटीसचा खुलासा केला, तो समाधानकारक नसल्यामुळे शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारhighwayमहामार्गAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग