लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जानेवारी ते ४ मार्च २०१८ पर्यंत १५५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने महसूल विभाग आणि कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अध्यक्षांना पाठविला आहे. शेतक-यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी शासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत.कर्जबाजारी, नापिकी आणि आस्मानी संकटांमुळे शेतीमालाचे होणारे नुकसान असह्य झाल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असले तरी यामागील खरी कारणे शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेले कै. नाईक मिशननेही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.१ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या पूर्ण वर्षभरात विभागामध्ये ७७० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. नवीन वर्षातही शेतकºयांच्या आत्महत्यांचा सिलसिला कायम आहे.४ मार्च २०१८ पर्यंत १५५ शेतकरी दगावले आहेत. त्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ७२ प्रकरणांची प्रशासकीय स्तरावर चौकशी सुरू आहे. ३० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. ५३ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली.विभागातील जिल्हानिहाय आत्महत्याऔरंगाबाद २५जालना १८परभणी २१हिंगोली ०९नांदेड १७बीड २४लातूर १५उस्मानाबाद २६
मराठवाड्यात तीन महिन्यांत १५५ शेतक-यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:43 IST
मराठवाड्यात १ जानेवारी ते ४ मार्च २०१८ पर्यंत १५५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने महसूल विभाग आणि कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अध्यक्षांना पाठविला आहे. शेतक-यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी शासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत.
मराठवाड्यात तीन महिन्यांत १५५ शेतक-यांची आत्महत्या
ठळक मुद्देत्रस्त मराठवाडा : महसुली उपाययोजना कागदावरच; शासनस्तरावर पूर्ण दुर्लक्ष; शेतीमालाचे नुकसान असह्य