शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १५० इलेक्ट्रिक बस ६ महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:55 IST

३ हजार डिझेल बसचे होणार ‘एलएनजी’त रूपांतर, ‘सीएनजी’चाही विचार

ठळक मुद्दे‘एसटी’चा खर्च कमी करून उत्पन्नवाढीवर भर दिला जात आहे. डिझेलच्या बस ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आगामी ६ महिन्यांत १५० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यानंतरही इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता ३ हजार डिझेल बस ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’(एलएनजी)मध्ये रूपांतरित केल्या जातील. तसेच सीएनजी बसही चालविण्याचा विचार सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी रविवारी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावानंतर आगामी कालावधीत प्रवासी सेवा वाढीच्या दृष्टीने रविवारी शेखर चन्ने यांनी औरंगाबादेत बैठक घेतली. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेखर चन्ने म्हणाले, ‘एसटी’चा खर्च कमी करून उत्पन्नवाढीवर भर दिला जात आहे. डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डिझेलच्या बस ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० आणि एकूण ३ हजार अशा बस धावतील. केंद्र शासनाच्या योजनेतून आगामी ६ महिन्यांत १५० इलेक्ट्रिक बस येतील. सीएनजी बसही चालवण्याचा प्रयत्न आहे; परंतु या बस १५० कि.मी.पेक्षा जास्त चालत नाहीत. त्यामुळे रीफिलिंगचा विषय येतो. यात नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्याचा विचार केला जाईल, असे शेखर चन्ने यांनी सांगितले. राज्यात ५५० भाडेतत्त्वावरील शिवशाही बस होत्या. पुरवठादारांनी त्यांची संख्या २२५ केली आहे. या बसची आणखी आवश्यकता आहे. त्यामुळे या बस वाढविल्या जातील. एसी स्लीपर बस आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

अपघातानंतर आता आजारांपासून सुरक्षित प्रवासअपघातमुक्त, सुरक्षित प्रवास ही एसटीची ओळख आहे. आता कोरोना विळख्यात संसर्गाचा कमी धोका कमी असेल, असा प्रवास प्रवाशांना पाहिजे. त्यास आता आमचा प्राधान्यक्रम असल्याचे शेखर चन्ने म्हणाले.

कोल्ड स्टोअरजेसह मालवाहतूकराज्यात एक हजार बसद्वारे मालवाहतूक केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात फळ व शेती उत्पादनांसह औषधींची वाहतूक करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज असलेल्या बसद्वारे मालवाहतुकीचा विचार केला जात असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन