शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येची धमकी देत पंधरा वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:18 IST

आत्महत्या करीन अशी, धमकी देत २५ वर्षीय  विवाहित नराधमाने पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले.

औरंगाबाद : माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन अशी, धमकी देत २५ वर्षीय  विवाहित नराधमाने पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले. छावणी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यांनतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही आरोपी व त्याच्या नातलगांनी मारहाण केली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सागर श्री सुंदर (वय २५,रा. छावणी परिसर) असे  नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. याविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी पंधरा वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकत आहे. तिच्या घराशेजारी सागर राहतो. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. शाळेत येता-जाता आरोपी तिचा रस्ता अडवून तु खुप सुंदर आहे, माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकीन अशी धमकी देत. सहा महिन्यापूर्वी त्याने तिला अडविले आणि स्वत:च्या वाहनावरून विविध ठिकाणी फिरवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. ही बाब आरोपीच्या नातेवाईकांना माहित होती. असे असूनही त्यांनी त्याला पाठिशी घातले. 

गेल्या काही दिवसापासून त्याच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे पीडितेचे अभ्यासात लक्ष्य लागेना. शिवाय ती सतत घाबरल्यासारखी राहते असे, तिच्या आईच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता तिने रडतच तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली.  त्यानंतर त्यांनी पीडितेला सोबत घेऊन छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक  कायद्यांसह आरोपींविरोधात बलात्कार करणे, मारहाण करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरवसे यांनी लगेच आरोपीला अटक केली.