शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जनधन खात्यात अचानक जमा झाले १५ लाख; आनंदात शेतकऱ्याने बांधले घर पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 12:34 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच पैसे जमा केल्याचे समजून आनदांत शेतकऱ्याने घर बांधून काढले.

औरंगाबाद : सर्व भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार, हे  २०१४ च्या लोकसभा निवडणूक पूर्व लोकप्रिय आश्वासन केवळ प्रचाराचा भाग असल्याचे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. परंतु, एका शेतकऱ्यासाठी आश्चर्यकारकरित्या ही घोषणा सत्यात उतरली. पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात काही दिवसांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा  झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनीच पैसे जमा केल्याचे समजून आनदांत शेतकऱ्याने घर बांधून काढले. मात्र, काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ पुढे आला. आता बँक, जिल्हा परिषद या शेतकऱ्याकडे पैसे परत करण्याची विनंती करत आहे. 

विदेशातून काळापैसा आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये करणार, असे आश्वासन भाजपकडून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. सत्तेत आल्यानंतर मात्र १५ लाख रुपयांचे केवळ आश्वासन असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. यावरून विरोधक आजही भाजपवर टीका करत असतात. मात्र, पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर औटे यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेतील जनधन खात्यात काही महिन्यांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. औटे यांना काही तरी चूक झाली असेल पैसे पुन्हा वळती होतील असे वाटले. मात्र, बरेच दिवस वाट पाहूनही पैसे वळती झाले नाहीत. त्यामुळे औटे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच हे पैसे जमा केल्याचे वाटले. शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याचा आभाराचा मेल पाठवत खात्यातून ९ लाख रुपयांच्यावर पैसे काढून घर बांधले. 

दरम्यान, पिंपळवाडी ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करायचे १५ लाख रुपये चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाल्याचे बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना नंतर लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी लागलीच ज्ञानेश्वर यांच्या खात्यातून उरलेली रक्कम वळती करून घेतली. आता बँक ज्ञानेश्वर औटे यांच्याकडे उरलेले पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादbankबँकNarendra Modiनरेंद्र मोदी