शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर दुसऱ्या दिवशीही १४४ अतिक्रमणे भुईसपाट; अनधिकृत कब्जेदार हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:40 IST

व्यापाऱ्यांनी उभारलेले शेड, पायऱ्या, संरक्षण भिंती, मिनी गार्डनवर टाच

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास रोडवर ‘साईड मार्जिन’मध्ये ‘सर्व्हिस रोड’ प्रस्तावित आहे. महापालिकेने मागील अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यावर अतिक्रमणे केली. मंगळवारपासून या भागात अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ११८ अतिक्रमणांवर कारवाई केली. बुधवारी दुसऱ्या दिवशी तब्बल १४४ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील व्यापारी हवालदिल आहेत.

मार्च २०१९ मध्येही महापालिकेने बीड बायपासवर सर्व्हिस रोडच्या नावाखाली मोठी मोहीम राबविली होती. ही मोहीम जवळपास एक महिना सुरू हाेती. मोठ-मोठ्या इमारतींचा भाग या कारवाईत पाडण्यात आला होता. पण नंतर सहा वर्षांत मनपाने सर्व्हिस रोडच्या जागेचे काय झाले, हे पाहिले नाही. ३ जूनपासून पुन्हा या भागात कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी देवळाई चौकाच्या उत्तर बाजूने कारवाई केली. बुधवारी सकाळपासून दक्षिण दिशेला म्हणजेच बजाज हॉस्पिटलकडील भागात कारवाईला सुरुवात केली. प्रारंभी सामान काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना वेळ देण्यात आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बजाज हॉस्पिटलपर्यंत कारवाई करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर लोखंडी अँगल लावून जागा व्यापली होती. एका हॉटेल व्यावसायिकाने मिनी गार्डन तयार केले. छोटे-छोटे तात्पुरते शेड उभारण्यात आले होते. ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त भरत भिरारे, राहुल जाधव, अर्जुन गिराम, नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे आदींनी केली.

२० फुटांचे होर्डिंगया भागातील पेट्रोल पंपासमोर २० फूट रुंद अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले होते. महापालिकेने हे अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू करण्यात आली. जमीनदोस्त केलेल्या होर्डिंगमध्ये साडेतीन टन लोखंड होते. सर्व लोखंडी अँगल तोडण्यात आले. या कारवाईत मनपाचे दोन कर्मचारी जखमी झाले. गणेश राजपूत, शेख वाजेद अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण