जालना : शिक्षण बचाव कृति समितीने राज्यभर पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात जिल्ह्यातील १४१ खाजगी शाळांनी सहभाग नोंदविला.शिक्षण बचाव कृति समितीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत. यात २८ आॅगस्ट २०१५ रोजीचा जाचक शासन निर्णय रद्द करावा, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना त्वरित अनुदान देण्यात यावे, २००५ पूर्वी व नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शाळांना वेतनेतर अनुदान पूर्वीप्रमाणेच द्यावे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतिबंध लागू करावा आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनात प्राथमिकच्या १३७ पैकी १३ तर माध्यमिकच्या ३०२ पैकी ७५, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ८७ पैकी ४२ तर २५ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ११ बंद होते अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी दिली. (प्रतिनिधी)
१४१ खाजगी शाळांचा बंद
By admin | Updated: December 9, 2015 23:49 IST