शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:21 IST

विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व मुलीच्या ३ मैत्रिणी, असे ५ साक्षीदार फितूर झाले

औरंगाबाद : भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला. 

विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व मुलीच्या ३ मैत्रिणी, असे ५ साक्षीदार फितूर झाले असतानाही न्यायालयाने सबळ पुराव्याआधारे ‘पोस्को’ कायद्यान्वये ही शिक्षा ठोठावली आहे. यासंदर्भात खामगाव येथील पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती की, ३० डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादी शेतात काम करीत असताना पीडित मुली (वय १०) ची  मैत्रीण त्यांच्याकडे गेली. वर्गशिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) हा वर्गातील इतर मुलांना डोळे बंद करायला लावून पीडित मुलीला पाठीमागच्या बाकावर बसवून तिच्याशी लैंगिक चाळे करतो, करायला लावतो व असा प्रकार त्याने अनेकदा केला, असे सांगितले.

फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, वर्गशिक्षक सोहेलने असा प्रकार चारदा केल्याचे तिने सांगितले. विरोध केल्यावर सोहेल पाठीवर चापटीने मारहाण करीत असल्याचेही तिने सांगितले. फिर्यादीने ८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दिल्यावरून भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ) सहबाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) कलम ८ व १२ अन्वये वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पीडित मुलगी, तिची आई व साक्षीदार फितूर

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात डॉक्टराची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व तीन मैत्रिणी असे ५ साक्षीदार फितूर झाले. सुनावणीअंती बाललैंगिक अत्याचार सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड, ‘पोस्को’कायद्याच्या कलम ६ अन्वये १४ वर्षे सश्रम कारावास आणि  दोन हजार रुपये दंड , कलम ८ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि कलम १२ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.