शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

साडेतीन तासांत १३४२ महिलांनी बनविले ७२,७४४ लाडू; आषाढी एकादशीला पंढरपुरात वाटणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 26, 2023 20:22 IST

‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष.

छत्रपती संभाजीनगर : गायिका सरला शिंदे या विठ्ठलाचे गाणे गात होत्या आणि त्या तालावर महिला शेंगदाणा-गुळाचा लाडू तयार करीत होत्या. काही महिला टाळ वाजवत नृत्य करीत सर्वांचा उत्साह वाढवीत होत्या... तर विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा केलेली मुले टोपलीत तयार लाडू घेऊन दुसऱ्या खोलीत ठेवत होते... आपण बनविलेला लाडू पंढरपुरात विठोबासमोर नैवेद्य दाखविण्यात येणार व नंतर वारकरी तो लाडू प्रसाद म्हणून खाणार, या कल्पनेनेच महिला धन्य होत्या. रविवारी १३४२ महिलांनी साडेतीन तासांत ७२,७४४ लाडू तयार करून आपला मागील वर्षीचा विक्रम मोडला.

‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष. सिंधी कॉलनीतील बालाजी मंगल कार्यालयात महिला भाविकांची गर्दी जमली होती. नियोजनानुसार सकाळी ११ वाजता लाडू बांधण्यास सुरुवात होणार होती, पण महिलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अर्धा तास आधीच म्हणजे १०:३० वाजता लाडू बांधण्यास सुरुवात झाली. गटागटाने गोल रिंगण करून महिला बसल्या होत्या व शेंगदाण्याचे कूट व गूळ घेऊन लाडू बांधत होत्या.

एक तास झाल्यावर त्या महिला उठत होत्या व दुसऱ्या महिलांना जागा करून देत होत्या. दुपारी २ वाजेपर्यंत शेंगदाणा व लाडूचा कूट संपला व लाडू बनविणे थांबले. साडेतीन तासांत ७२७४४ लाडू तयार झाले होते. यशस्वितेसाठी मनोज सुर्वे, लक्ष्मीकांत सुर्वे, विलास गायकवाड, उमाकांत वैद्य, अर्जुन पवार, भैरव कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी, जगन्नाथ गीते आदी भाविकांनी सहकार्य केले.

पुढील वर्षी १ लाखयंदा ७० हजार लाडूंचा संकल्प होता. प्रत्यक्षात ७२,७४४ लाडू तयार झाले. पुढील वर्षी १ लाखाचा संकल्प आहे.- कुश सर्वे,आयोजक

खास पुण्याहून आले‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमात मी पाच वर्षांपासून खास पुण्याहून येत आहे.- मयुरी राठोड, भाविक

परमानंद मिळतोआपण बनविलेला लाडू पंढरपुरात विठ्ठलासमोर नैवेद्य दाखविला जातो व नंतर वारकरी त्याचा आस्वाद घेतात, ही कल्पनाच परमानंद देऊन जाते.- ज्योती नंदावने, भाविक

वारकऱ्यांची अशी सेवापंढरपूरला जाता आले नाही. मात्र, येथेच शेंगदाणा व गुळाचे लाडू बनविले व ते आषाढीला वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आपलाही खारीचा वाट हाच आनंद.- प्रतीक्षा पवार,भाविक

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Aurangabadऔरंगाबाद