शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ उद्यानातील १३ वर्षांच्या आजारी ‘नाझिया’चा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:10 IST

सहा दिवसांपासून आजारी 

ठळक मुद्देपिवळे वाघ, बिबट्या साधारणपणे १८ ते २० वर्षे सहजपणे जगतात

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्या (नाझिया) हिचा काल रात्री ८.३० वाजता मृत्यू झाला. १३ वर्षांची नाझिया मागील सहा दिवसांपासून अंथरुणाला खिळली होती. उपचारालाही अजिबात प्रतिसाद देत नव्हती. आज दुपारी प्राणिसंग्रहालयातच तिच्यावर वन विभागाच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे मागील काही महिन्यांपासून निलंबित होते. ते पुन्हा रुजू होताच प्राण्यांचे मृत्यू सत्र सुरू झाले. रेणू या वाघिणीची पिल्ले सतत मरण पावत असल्याने डॉ. नाईकवाडे यांना निलंबित करण्यात आले होते. अलीकडेच पुन्हा त्यांना निलंबित केले होते. डॉ. निपुण विनायक यांनी नाईकवाडे यांना रुजू करून घेतले. बिबट्या मादी नाझिया अवघ्या ३ वर्षांची असताना  तिला संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली येथून आणण्यात आले होते. मागील १० वर्षांपासून नाझिया आनंदाने सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात राहत होती. मागील सहा दिवसांपासून ती अंथरुणाला खिळली होती. डॉ. नीती सिंग तिच्यावर उपचार करीत होते. तिच्या रक्त, विष्ठेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

या अहवालावरून औषधोपचार सुरू होते. औषधोपचाराला नाझिया अजिबात प्रतिसाद देत नव्हती. गुरुवारी रात्री ८.३० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली. त्यानंतर १०.३० वाजता खडकेश्वर पशुसंवर्धन कार्यालयातील सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी, डॉ. अश्विनी यांनी तिचे शवविच्छेदन केले. तिचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. तांबे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वन विभागाच्या नियमानुसार नाझियावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१८ ते २० वर्षे वयोमर्यादापिवळे वाघ, बिबट्या साधारणपणे १८ ते २० वर्षे सहजपणे जगतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली. नाझिया अवघ्या १३ वर्षांची असताना ती मरण पावल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यांची संख्या वाढू नये म्हणून मागील काही वर्षांपासून तिला एकटीच ठेवण्यात आले होते.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका