लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची जिल्ह्यातील १३ प्रकरणे जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आली.अपघातामुळे विद्यार्थ्यांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने पहिली ते उच्च शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविली जाते. यात अपघातामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकास ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची तरतूद आहे. जि.प.शिक्षण विभागातील अशी १४ प्रकरणे समितीसमोर ठेवली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत १३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. १३ ही प्रकरणे अपघातामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची असल्याने या सर्व विद्यार्थ्याच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पी.आर.कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उपस्थिती होती.
अपघात अनुदानाची १३ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:29 IST