शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:36 IST

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर ऑफलाईन पद्धतीने दिला. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याने शैक्षणिक प्रवाह पुन्हा सुरु झाल्याचा चित्र दिसून आले. शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील ४७० कनिष्ठ महाविद्यालये, शाळांपैकी १५३ मुख्य तर २८७ उपकेंद्रे अशा  ४४० परीक्षा केंद्रांवर आज परीक्षा पार पडली. 

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. केंद्रावर विद्यार्थ्यांना तासभर आधी उपस्थित राहायच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तर काही केंद्रांनी सकाळी ९ वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता. यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली. ऑनलाईन शिक्षण घेऊन दोन वर्षांच्या खंडानंतर ऑफलाईन पेपरला सामोरे जाताना काही विद्यार्थी साशंक वाटले. तर काही विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण दिसून आली. पहिलाच पेपर कंपल्सरी इंग्रजी भाषेचा असल्याने केंद्रांवर अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात ७ जिल्हास्तरीय, ९ तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात आहेत. मुख्य केंद्रावर चार सदस्यीय आणि उपकेंद्रावर रनर यांनीच बैठ्या पथकाची भूमिका बजावली. परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या जात असताना काॅपीमुक्त परीक्षेबद्दल मात्र कोणीच बोलत नसल्याने काॅपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

केंद्र संचालक जबाबदारगैरप्रकार होऊ नये ही तेथील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची जबाबदारी आहे. शाळा तेथे परीक्षा होत असल्याने सर्वच शाळांना सूचना दिल्या. त्यानुसार तयारी पूर्ण झाली आहे. त्याच शाळेचे विद्यार्थी, पालक असल्याने गैरप्रकार, उपद्रवाचा प्रश्न निर्माण होणार नाही. गैरप्रकार आढळल्यास केंद्रप्रमुखांना बाहेरचे लोक होते, असे कारणही देता येणार नाही.-एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाEducationशिक्षण