शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

१२५ कोटींच्या निविदा उघडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:12 IST

राज्य शासनाचे १०० कोटींचे अनुदान आणि महापालिकेच्या तिजोरीतील ५० कोटी रुपये टाकून १५० कोटी रुपयांच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केल्या होत्या. मागील एक वर्षापासून सिमेंट रस्ते करण्याचा हा प्रकल्प विविध आरोप-प्रत्यारोपांत रखडला होता. अखेर मंगळवारी रात्री महापालिकेने १२५ कोटींच्या निविदा उघडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासनाचे १०० कोटींचे अनुदान आणि महापालिकेच्या तिजोरीतील ५० कोटी रुपये टाकून १५० कोटी रुपयांच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केल्या होत्या. मागील एक वर्षापासून सिमेंट रस्ते करण्याचा हा प्रकल्प विविध आरोप-प्रत्यारोपांत रखडला होता. अखेर मंगळवारी रात्री महापालिकेने १२५ कोटींच्या निविदा उघडल्या. पाच वेगवेगळ्या कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत. यातील काही कंत्राटदारांवर मनपानेच ब्लॅकलिस्टची कारवाई केलेली होती. त्यामुळे पुन्हा नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचे अनुदान दिले होते. हे अनुदान आल्यावर कोणत्या रस्त्यांची कामे करावीत या मुद्यावरून सर्वपक्षीय नेते, नगरसेवक आपसात भांडत होते. कशीबशी ५१ रस्त्यांची यादी निश्चित करण्यात आली. त्यानंतर कंत्राटदारांमध्ये वाद उफाळला. एकाच कंत्राटदाराने सर्व कामांवर डल्ला मारला. त्यामुळे कंत्राटदार न्यायालयात गेले. न्यायालयातील वाद संपुष्टात आल्यावर पुन्हा निविदा काढण्यात आल्या. दोन कंत्राटदार पुन्हा न्यायालयात गेले. अलीकडेच महापौर नंदकुमार घोडेले यांनी यशस्वी शिष्टाई करून न्यायालयीन वाद संपुष्टात आणला. त्यामुळे मंगळवारी निविदा उघडण्यात आल्या. पाच वेगवेगळ्या मोठ्या कंत्राटदारांनी ही कामे घेतली आहेत.यामध्ये जेएनआय, वंडर कन्स्ट्रक्शन, मस्कट कन्स्ट्रक्शन, जे.पी. कन्स्ट्रक्शन, चारनिया कन्स्ट्रक्शन यांना प्रत्येकी २५ कोटींची कामे मिळाली आहेत. यातील काही कंत्राटदारांवर सार्वजनिक बांधकाम, महापालिकेत बरेच आरोप झालेले आहेत. महापालिकेने एका कंत्राटदारावर तर ब्लॅकलिस्टची कारवाईसुद्धा केलेली आहे. नंतर स्थायी समितीमध्ये गुपचूप ही स्थगिती उठविण्यात आलीहोती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या