शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाज्योतीच्या फेलोशिपसाठी १२२६ संशोधक पात्र, पण मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने नाराजी

By योगेश पायघन | Updated: November 2, 2022 18:52 IST

पीएचडी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्पुरती निवड यादी जाहीर

औरंगाबादमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी १५३९ अर्ज प्राप्त झालेले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची व मूळ कागदपत्रांची तपासणी महाज्योतीकडून नागपुर येथे १ ते ९ सप्टेंबर रोजी झाली. त्यात १२२६ अर्ज पात्र ठरवण्यात आले. त्यांची तात्पुरती निवड यादी बुधवारी जाहीर झाली. फेलोशिपच्या प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने विद्यार्थ्यांत नाराजीचा सुर आहे.

महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या १ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत १२२६ पात्र उमेदवारांना १ नोव्हेंबर २०२२ या या मंजूर दिनांकापासून अधिछात्रवृत्ती (प्रथम दोन वर्षे ३१,००० रूपये सोबक एचआरए व आकस्मिक खर्च, त्यापुढील तीन वर्षे ३५,०००रुपयांसोबत एचआरए व आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांची तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांनी महाज्योती, नागपूरच्या पीएचडी एमआयएस मध्ये पीएच.डी अभ्यासक्रम सुरु असल्याबाबत प्रमाणपत्र एमआयएस प्रणालीत अपलोड करून अधिछात्रवृत्ती विभाग प्रकल्प व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे २२ नोव्हेंबर पर्यंत रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट ने पाठवावे. कालावधीत प्रमाणपत्र सदर न करणाऱ्या उमेदवारांचा अधिछात्रवृत्ती देण्यात येणार नाही. असे व्यवस्थापकीय संचालकांनी परिपत्रकात म्हटले आहे.

आक्षेप पुराव्यासह मेल कराउमेदवारांनी प्रमाणपत्र सादर केल्यावर या कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात येईल. ज्या उमेदवारांचे वर नमूद प्रमाणपत्र योग्य आढळून येईल अशा उमेदवारास एमआयएस द्वारेच अधिछात्रवृत्ती प्रदान पत्र डाऊनलोड करता येईल. यादीबाबत काही आक्षेप असल्यास या कार्यालयाच्या mahajyotifellowship२०२२@gmail.com या मेलवर पुराव्यासहित सादर करावेत. असे आवाहन महाज्योती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र