शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील बारा हजार नागरिकांनी करून घेतली चारित्र्य पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:38 IST

आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो. 

ठळक मुद्देकेवळ शंभर रुपये शुल्कआॅनलाईन अर्जाची सुविधा वर्षभराचा कालावधी

- बापू सोळुंके

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या १० हजार ३७ आणि ग्रामीण भागातील दोन हजार नागरिकांनी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी केवळ शंभर रुपये शासनाचे शुल्क असून, आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो. 

पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात विविध बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्या कामगार अथवा अन्य कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अथवा नाही, याबाबत खात्री करून घेतात. त्याकरिता कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त कार्यालयाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवून घेतात. शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही गोपनीय पद्धतीने चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस विभागाकडून मागविला जातो. शिवाय रिक्षाच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

यावर्षी १ जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत शहरातील तब्बल १० हजार ३७ नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. शिवाय पासपोर्ट (पारपत्र) तयार करण्यासाठी आणि एस.टी.तील वाहक पदासाठी लागणारा बॅच काढण्यासाठीही चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता असते. यामुळे असा पडताळणी अहवाल मागविणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

आॅनलाईन अर्ज उपलब्धचारित्र्य पडताळणी करण्यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज सादर करता येतो. चारित्र्य पडताळणीसाठी शंभर रुपये शुल्क असून हे चलन स्वरूपात आॅनलाईन पद्धतीने अथवा आॅफलाईन स्वरूपातही जमा करता येते. शिवाय जेव्हा एखाद्या उमेदवाराची निवड शासकीय नोकरीसाठी होते. तेव्हा त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी संबंधित विभागाकडून परस्पर केली जाते. तेव्हा त्यासाठी कोणतेही शुल्क उमेदवाराला भरावे लागत नाही.

ग्रामीणमध्ये २ हजार नागरिकांनी केली चारित्र्य पडताळणीग्रामीण भागातील सुमारे दोन हजार नागरिकांनी स्वत:ची चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले. ग्रामीण पोलिसांकडून आॅनलाईनची सुविधा उपलब्ध नाही, यामुळे नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागतो.

चारित्र्य पडताळणी अहवाल कशासाठी- पासपोर्ट (पारपत्र) काढताना- सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी- रिक्षाचे परमिट काढण्यासाठी- स्वत:वरील दाखल गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसpassportपासपोर्ट