शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खळबळजनक ! विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार, विधिमंडळाच्या आश्वासन समितीने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 17:57 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News: विधिमंडळाच्या आश्वासन समितीने विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडेंच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार (120 crore fraud in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University during 2017-18 ) झाल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या चौकशी अहवालात समोर आले आहे. 

विद्यापीठात निविदा प्रक्रिया न राबविता मर्जीतील कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करणे, विद्यार्थी संख्येपेक्षा दुपटीने प्रश्नपत्रिकांची छपाई करण्याचे कंत्राट देणे, महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या संलग्निकरण शुल्काची नोंद न ठेवणे, ऑनलाइन असो वा ऑफलाईन प्रश्न पत्रिका वितरणासाठी अधिक खर्च करणे आदी ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. या समितीने विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. आता महाआघाडी सरकार यासंदर्भात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय होता आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या 'नॅक' मूल्यांकनाच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती गठित केली होती. विद्यापीठात २०१७-१८ या कालावधीत गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी, रस्ते तसेच विविध विभागांत यंत्रसामग्री, इमारतींना रंगरंगोटी करणे, किरकोळ दुरुस्तींच्या मूळ कामे कोट्यवधी रुपयांनी वाढवल्याचा ठपका होता.

या समितीने केली चौकशी चौकशी समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके हे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकुर्णी, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विभागीय आयुक्त कार्यालयातील तपासणी शाखेच्या सहायक आयुक्त वैशाली रसाळ, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र मडके, मुंबई विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण