शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

१२ शाळा आयएसओच्या दिशेने

By admin | Updated: January 15, 2016 23:38 IST

विठ्ठल फुलारी, भोकर लोकमत लोकसहभाग यातून शिवनगरतांडा येथील शाळा आयएसओ झाली असून याच शाळेचा वसा घेवून आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़

विठ्ठल फुलारी, भोकरलोकमत लोकसहभाग यातून शिवनगरतांडा येथील शाळा आयएसओ झाली असून याच शाळेचा वसा घेवून आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ यासाठी शिक्षकांची पदरमोड व पालकांचा आर्थिक सहभाग जुळून येत आहे़ याचबरोबर ग्रामपंचायतही शाळेसाठी मदत करणार आहे़ जिल्ह्यातील पहिली आयएसओ म्हणून शिवनगरतांड्याचा शाळेला मान मिळाला़ यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक व्ही़ एऩ चौहान, सहशिक्षक शिवानंद वाडकर या सोबत येथील कुडाच्या घरात राहणारे ग्रामस्थ आर्थिक बोजा उचलला़ या शाळेची प्रगती चालू असल्याने आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पाऊल टाकत आहेत़ यासाठी शिवनगरचे मुख्याध्यापक व्ही़ए़चौहाण हे प्रत्येक शाळेला भेटी देत मार्गक्रमण करीत आहेत़ याबाबत धारजनी, हाडोळी व हळदा येथे बैठकी झाल्या असून लामकाणी येथे कामाला सुरुवातही झाली आहे़ माझी ई-शाळा अंतर्गत हळदा, लामकाणी, मोघाळी, हाडोळी, कामनगाव, धारजनी, नांदा बु़, इळेगाव, धारजनीतांडा, नांदा बु़ तांडा, कुदळातांडा, सोसायटीतांडा येथील शाळेत डिजिटल रुम, टॅबलेट लर्निंग, संगणक कक्ष, स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, वायफाय या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिवंत चित्राद्वारे अध्ययन, अध्यापनात मदत होणार आहे़याचबरोबर आर्टरुम, सायन्सरुम, सब्जेक्टरुम, संगीतरुम, स्पोर्टरुम, वाचनालय व मीडिया सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे़ शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ होवून शाळा सुंदर व आकर्षक करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे़ याचसोबत ज्ञानरचनावाद, ई-लर्निंग व परंपरागत शिक्षण याच्या एकत्रित वापरातून स्वेच्छिक अध्ययनची रचना करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यात येत आहे़ या कामासाठी कोणताच शासकीय निधी नसला तरी या सर्व शाळेतील शिक्षक पदरमोड करून व पालकांचे आर्थिक साह्य घेवून वाटचाल करीत आहेत़ यासाठी ग्रामपंचायतच्या वसुलीमधूनही मदत मिळणार आहे़ या कामासाठी केंद्रप्रमुख बी़ एऩ जाधव, मुख्याध्यापक के़ जी़ पेनलोड, आऱ के़ गायकवाड, आऱ आऱ सोनकांबळे, पी़ जी़ जोंधळे, पी़ एम़ कोळी, के़ व्ही़ कुलकर्णी, जी़ यु़ सोळंके, एस़ एल़ कंचकलवाड, आऱ एम़ आडे, बी़ बी़ उपर्वद, एस़ एस़ रणवीर, जी़ टी़ चाबुकस्वार यासह या शाळेतील सर्व शिक्षक या शाळा १०० टक्के प्रगत करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे़ एकाच केंद्रातील सर्वच शाळा आयएसओच्या मानांकनासाठी प्रयत्न सुरू झाल्याने जिल्ह्यासाठी शिक्षण विभागाची ही एक क्रांती ठरणार आहे़