शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पानदरिबा गोडाऊनमध्ये उतरविलेला १२ लाख ८७ हजारांची सुगंधी तंबाखू, विदेशी सिगारेट पोलिसांनी केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:01 IST

पानदरिबामधील एका गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत १२ लाख ८७ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद : पानदरिबामधील एका गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत १२ लाख ८७ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.श्रेणिक सुरेश सुराणा (रा.मोतीकारंजा) आणि शेख आसीफ लाला शेख बाबा लाला (२८, रा. बुढीलेन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, पानदरिबा येथील चौधरी कॉम्प्लेक्समधील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेट विक्रीसाठी आणून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सिनगारे यांनी अन्नसुरक्षा अधिकारी आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चौधरी कॉम्प्लेक्सवर धाड टाकली. यावेळी तेथे विविध खोक्यांमध्ये गुटखा, विविध लेबल लावलेले आणि विनालेबलचे सुगंधी तंबाखंूचे खोके, विदेशी सिगारेटचा साठा आढळला. यात १० लाख २ हजार ६०० रुपये कि मतीची सुगंधी तंबाखू, पान मसाल्याचे सुमारे ४० मोठे खोके माल आहे. तर २ लाख ८५ हजार रुपये किमतीची पॅरिस स्पेशल फिल्टर सिगारेटची १३ मोठी खोकी, रुल्ली रिव्हर स्पेशल फिल्टर सिगारेटची ६ मोठी खोकी पोलिसांच्या हाती लागली. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी, प्रशांत अजिंठेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, कर्मचारी शेख गफ्फार, समाधान सोनुने, सचिन शिंदे, मनोज पाटील, अभिजित गायकवाड यांनी सहभाग घेतला.रसायनमिश्रित तंबाखूजप्त करण्यात आलेली सुगंधी तंबाखू ही रसायन मिश्रणाने तयार केलेली असते. ही तंबाखू शरीरासाठी अपायकारक आहे. या तंबाखूच्या सेवनाने क र्करोग होण्याचा धोका असल्याने शासनाने अशी तंबाखू विक्री करण्यावर प्रतिबंध घातला आहे. असे असताना आरोपी हे चोरट्या मार्गाने तंबाखू आणून ठोकदराने टपरीचालक, दुकानदार यांना विक्री करीत होते. शिवाय विदेशी सिगारेटवर शासनाने ठरवून दिलेले धोक्याचे चित्र नसते. यामुळे अशा प्रकारच्या सिगारेट विक्रीवर बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी