शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

दसरा मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदारही येणार, पुढील घोषणा तिथेच: मनोज जरांगे

By बापू सोळुंके | Updated: October 1, 2024 14:20 IST

आरक्षण न दिल्यास नाईलाजाने राजकारणात यावे लागेल; मराठा नेते मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर: नारायणगड येथे दसरा मेळाव्याला लाखो लोक येणार आहेत. या मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदार समाज येणार आहे. मेळाव्याची तयारी सुरू असल्याचे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. मेळाव्यात उमेदवार उभे करण्याची घोषणा करणार का, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला १२ ऑक्टोबर रोजी मिळेल असेही त्यांनी नमूद केले. तसेच गरीब मराठा समाजासाठी मी आरक्षण मागतोय, मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे उपलब्ध आहे, आचारसंहितेपूर्वी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देत नसाल तर,सरकार स्वत:च्या पायावर दगड पाडून घेईल, नाईलाजाने मला राजकारणांत यावे लागेल असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला दिला.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, काल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी पुराव्यांची संख्या वाढविल्याचे सांगितले. आम्ही सरसकट कुणबी आरक्षण मागतो आहे. पुरावे मिळवूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, असे दिसते. मात्र मराठ्यांना डावलून तुम्ही निवडणुक लढत असाल तर ही तुमची मोठी चुक असेल. जातीच्या विरोधात जाणारी कथित अभ्यासकांची टोळी एकत्र येत असेल तर समाज बघेल, जातीशी बेईमानी करणारे काल बैठकीला होते, असेही जरांगे यांनी नमूद केले. 

आपल्याकडे येणाऱ्या नेत्यांची मजा घेतोयआपल्या भेटीला येणारे सत्ताधारी आणि महाविकास आघाडीचे नेते हे छायाचित्र आणि व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर टाकत असतात. यातून जरांगे त्यांच्यासोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ते करतात, त्यांना तुम्ही काय संदेश देणार असा सवाल केला असता ते म्हणाले, भेटायला येणाऱ्या नेत्यांना मी आडवू शकत नाही. मात्र, आपला कोणालाही पाठींबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

देवेंद्र फडणवीस यांना समजणं सोपं नाहीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजणं सोपं नाही.आता ते एखाद्याला सारथीवर तर कोणाला महामंडळावर घेतील. त्यांचे काम म्हणजे साखर कारखान्याशेजारी मुंगीपालन व्यवसाय करण्यासारखं आहे. मुंग्या कारखान्यातील साखर ओढून आणतील आणि ती साखर विकून आपण साखर सम्राट व्हायचं असे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण