शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Maharashtra Bandh : वाळूजमध्ये उद्योगांचे ११६ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:36 IST

वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबंदमुळे शासनाचा १६ कोटींचा कर बुडाला १०० कोटी रुपयांच्या उद्योग प्रक्रियेला ब्रेक लागला

- विकास राऊत औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे. यामध्ये १६ कोटी रुपयांचा शासनाचा करही बुडाला आहे. ४ हजार ५०० लहान-मोठे उद्योग वाळूज एमआयडीसीमध्ये आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये काही उद्योग सुरू झाले होते; परंतु आंदोलकांनी ते बंद पाडले. ९ वाजेपासून १०० टक्के उद्योग बंद झाले होते. त्यामुळे हे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

उद्योगांची एक उत्पादन प्रक्रिया असते. त्या पूर्ण साखळी प्रक्रियेवर बंदमुळे परिणाम झाला. बंदमुळे उद्योगांच्या उलाढालीवर परिणाम होणे हे औरंगाबादसाठी घातक आहे. उद्योग वर्तुळात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. उद्योगांना टार्गेट करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. 

पैठण एमआयडीसीमध्ये ‘युनिव्हर्सल लगेज’ या कंपनीमध्ये एक घटना घडली होती. त्या एका घटनेमुळे ती औद्योगिक वसाहतच पूर्णत: संपली. ९ तारखेच्या घटनेची माहिती उद्योग वर्तुळातील मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मुख्यालयांपर्यंत गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घटना नोंदविली गेली. याचा परिणाम डीएमआयसीत येणाऱ्या गुंंतवणुकीवरदेखील होणे शक्य आहे. बंद, तोडफोड, नुकसानीच्या घटनांमुळे औरंगाबादचा विकास होण्यावर परिणाम होईल. कर्मचाऱ्यांच्या गाड्या कंपनीच्या आत जाऊ न देण्यापर्यंत आंदोलन ठीक होते; परंतु सगळ्या औद्योगिक वसाहतीलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसत असल्याचे उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

वाळूजचे नुकसान झाल्यास औरंगाबाद ५० टक्क्यांवर येईल वाळूज औद्योगिक वसाहतीचे नुकसान झाले, तर औरंगाबादचे उत्पन्न ५० टक्क्यांवर येईल. १२ लाखांच्या शहराची लोकसंख्या गृहीत धरली, तर ६ लाख लोकसंख्या उद्योगांवर अवलंबून आहे.उलाढालीवर बंदचा मोठा परिणाम होतो. औरंगाबादच्या उद्योग वर्तुळाची ३० हजार कोटींच्या मूल्यवर्धित कराच्या तुलनेत उलाढाल आहे. १० टक्क्यांच्या करतुलनेत ३ हजार कोटी रुपयांचा आकडा येतो. ३०० दिवस उत्पादनाचे दिवस धरून ३० हजार भागाकारच्या तुलनेने उत्पादन प्रक्रिया गृहीत धरली, तर १०० कोटींचे थेट नुकसान झाल्याचे दिसत असल्याचे मत उद्योजक कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महसूल विभाग आणि एमआयडीसीकडून पंचनामे सुरू वाळूज औद्योगिक वसाहतीत ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत उद्योगांचे किती नुकसान झाले, याचा आकडा आवाक्याबाहेर असून, महसूल प्रशासन आणि एमआयडीसीने शुक्रवारी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.वाळूज एमआयडीसी गंगापूर तहसील आणि औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येते. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यात एमआयडीसीचा काही भाग आहे. त्या भागात असलेल्या उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. 

बहुतांश उद्योग हे औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येतात. तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले, पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. विमा कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील पंचनामे करीत आहेत. किती नुकसान झाले याची माहिती लवकरच समोर येईल. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी तोडफोड झालेल्या कंपनीची शुक्रवारी दिवसभर पाहणी केली. पाहणी करून त्याचा अहवाल एमआयडीसी मुख्यालयात पाठविण्यात आला आहे. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राचा सुमारे ४५ लाख रुपयांचा फायरबंब आंदोलकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे वायाळ यांनी सांगितले.

गुरुवारच्या आंदोलनात रस्त्यावर झालेल्या दगडफेक, जाळपोळीमुळे साचलेला कचरा, रस्त्यांवर आडवे टाकलेले विजेचे खांब एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काढले. आंदोलकांनी जे रस्ते बंद केले होते, ते सुरू करण्यात आल्याचे वायाळ यांनी सांगितले. नुकसानीबाबत कंपन्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. सर्व कंपन्यांच्या तक्रारीनंतरच एकूण किती नुकसान झाले याचा आकडा समोर येऊ शकेल. लहान-मोठ्या मिळून ७० कंपन्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद