शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ११४ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:43 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.

औरंगाबाद : आधीच रस्ते खराब आणि त्यात पावसाची भर यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील  रस्त्यांची अक्षरश:  चाळण  झालेली  आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांकडून पावसाने बाधित रस्ते व पुलांच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार मुख्य अभियंता डी. डी. उकीर्डे यांच्या कार्यालयाने शासनाकडे ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची सर्वाधिक वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण तसेच कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद असे दोन विभाग असून या दोन्ही विभागांकडून ८ कोटी व ४ कोटी असा१२ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात  आला आहे. 

आठ ते दहा दिवसांत निधी प्राप्त होईल, अशी अपेक्षा असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. तर  दुसरीकडे आगोदरच रस्त्यांच्या  कामांची शेकडो बिले शासनाकडे प्रलंबित असल्याने खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी निधी मिळतो की नाही याबद्दल साशंकताच वाटावी अशी परिस्थिती आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग