शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

‘ग्रीनफिल्ड’चे ११३१ कोटी शहरासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:07 IST

स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. निधी वळविण्याचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत लवकरच केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली. पहिल्या वर्षी ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्या वर्षी केंद्राने औरंगाबाद शहराची निवड केली. स्मार्ट सिटीच्या १७३० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्राने मंजुरीही दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करावा म्हणून शासनाने दोन वर्षांपूर्वीच महापालिकेला २३० कोटी रुपयांचा निधीही दिला. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक वारंवार होत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे.या प्रकल्पात शहर बस खरेदी करण्यात आली. दिवाळीपर्यंत शहरात बसेस दाखल होतील. सेफ सिटीअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी निविदा काढली आहे. स्मार्ट योजनेत अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रीनफिल्ड होय. बुधवारी स्मार्ट सिटीचे मेन्टॉर तथा गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्रीनफिल्डसाठी राखीव असलेला ११३४ कोटी रुपयांचा निधी शहरात विविध विकास कामे करण्यासाठी वळविण्यात यावा, अशी आग्रही मागणी सर्व संचालक मंडळाने केली. पोरवाल यांनीही क्षणार्धात मंजुरी दिली. केंद्र शासनाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यास शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे महापालिकेला शक्य होेईल.बैठकीस उपमहापौर विजय औताडे, विरोधी पक्षनेता जमीर कादरी, सभागृहनेता विकास जैन, गटनेते भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती.ग्रीनफिल्ड प्रकल्प काय होता...ग्रीनफिल्डअंतर्गत चिकलठाणा येथे ५०० एकर जागेचे भूसंपादन करण्यात येईल. येथे सुंदर आयडियल एक छोटेसे शहर तयार करण्यात येईल. या वसाहतीत गुळगुळीत रस्ते, २४ तास पाणी, ड्रेनेज, टेलिफोन केबल अंडरग्राऊंड करण्यात येईल. २४ तास वीजपुरवठा, विजेच्या तारा जमिनीतून जातील.दूषित पाणी वाहण्यासाठी नाल्या झाकलेल्या असतील. घरे भूकंपरोधक असतील. फुटपाथ, लहान रुग्णालय, पार्क आदी कामे या ठिकाणी करण्यात येतील. आयटी कंपन्या, उदयोन्मुख तरुणांना रोजगार, असे दिवास्वप्न या प्रकल्पातून दाखविण्यात आले होते. या प्रकल्पासाठी तब्बल ११३४ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका