शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शिवरायांच्या पुतळ्याला १०१ प्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:31 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा : आंदोलनाचा सातवा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून ठोक आंदोलन सुरू केले. या आंदोलनांतर्गत कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली तर देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण केले. राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. औरंगाबाद शहरातील आंदोलनकर्त्यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने २१ जुलैपासून क्रांतीचौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. काल बुधवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. तर आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता शेकडो आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदक्षिणा सुरू केल्या. या प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी तेथे आले. या विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत प्रदक्षिणांमध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’आदी घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. यावेळी मनोज गायके, योगेश डेरे, मुकेश सोनवणे, अंकत चव्हाण, साईनाथ वेताळ, रमेश गायकवाड, विशाल डिडोरे, सुरेश वाकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन