शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 19:07 IST

गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देफार्महाउस बांधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कुठेही परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही.नऊ तालुक्यांत १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असण्याची शक्यता

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असण्याच्या संशय असून, जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना सर्वेक्षणाचा आदेश दिला आहे. खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सोयगाव- सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यांत जास्तीचे फार्महाऊस असून, ते व्यावसायिक उद्देशासाठी वापरण्यात येत असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे.

गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे.फार्महाउससाठी ‘फॉरेस्ट एनए’ आणि महसूल ‘एनए’ यापैकी काेणती परवानगी घेतलेली आहे, हे पाहणी करताना स्पष्ट होईल. फार्महाउससाठी ग्रामपंचायतींची बांधकाम परवानगी घेतलेली आहे का, शेतीमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नाही. याबद्दलही माहिती घेतली जाणार आहे. फार्महाउसची व्याख्या वेगळी आहे. शेतातील इमारती शोधणे, त्यांचा वापर कधीपासून आहे. त्या इमारती कधी बांधल्या आहेत. त्या नियमित करण्यासाठी महसूल अधिनियमांचा वापर केला जाणार आहे.

दंड तर लागेलचअलीकडच्या काळात फार्महाउस बांधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कुठेही परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही. फार्महाउसची व्याख्या वेगळी आहे; परंतु काही जणांनी त्याचा वापर पर्यटन, पार्ट्यांसाठी सुरू केल्याचे दिसत आहे. अशा फार्महाउसचा शोध घेऊन त्यांना दंड लावून ते नियमित करून घ्यावे लागेल. ‘एनए’ केलेला नसेल, प्रादेशिक विकास आराखड्याचा विचार करून बांधकाम केलेले नसेल, तर दंड लागेलच, असे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.

डोंगराळ भाग इको-सेन्सिटिव्हजिल्ह्यात इको-सेन्सिटिव्ह भाग मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वीच वेरूळ परिसरात बिबट्या आढळला. तो डोंगराळ भाग इको-सेन्सिटिव्ह आहे. अशा ठिकाणी फार्महाउस आहेत काय, याची शहानिशा प्रशासन करीत आहे. वेरूळ, खांडी पिंपळगाव, खुलताबाद, दौलताबाद, फुलंब्रीतील सारोळा, कन्नड परिसर, पैठण जायकवाडी परिसर, म्हैसमाळ, सोयगाव, देवळाई, सातारा, कचनेर, पाल फाटा येथील कमी-अधिक डोंगराळ भागात फार्महाउस असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. येथे बांधकाम करताना कोणती परवानगी घेतली आहे, याची पाहणी केली जात आहे. दोन महिन्यांत सर्व काही समोर येईल, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद