शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

By विकास राऊत | Updated: October 27, 2023 12:04 IST

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन, नुकसान आदी निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. बीड सोडून इतर जिल्ह्यांत पाऊस आणि उत्पादन यावरून विमा कंपन्यांनी विश्लेषणाची भूमिका घेतली आहे. परिणामी दिवाळीपूर्वी हा तांत्रिक तंटा सुटला नाही तर शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम मिळणे अवघड होणार आहे. बीड जिल्ह्यातील ८६ मंडळातील पाऊस आणि उत्पादनांच्या निकषाचे प्रकरण राज्य तांत्रिक सल्लागार समितीने निकाली काढले आहे.

दिवाळी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कंपन्यांनी अजून काहीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. असे चित्र सध्या तरी आहे. शासनाकडे याबाबत निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.

१०० टक्के नुकसान अमान्य१०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कंपन्या स्वीकारण्यास तयार नाही. मंडळनिहाय पावसाचा खंड हे देखील कंपन्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे. काही कंपन्यांनी पिकांनुसार देखील विमा देण्याचे निकष ठरविले आहेत. त्यात सोयाबीन, कापूस, बाजरीला विमा मिळणार नाही. १०० टक्के नुकसान, शून्य टक्के उत्पादन असे होतच नसते. ६२ टक्के नुकसान कंपन्या स्वीकारण्यास तयार आहेत. ३ आठवडे पावसाचा खंड ही कंपन्या गृहीत धरणार आहेत. निकषात बसणाऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा मिळेल. असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कसा गेला यंदाचा पावसाळा ?कापूस, मका, सोयाबीन पेरणी : ४० लाख हेक्टरविमा काढला : ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनीविमा संरक्षित रक्कम : २३ हजार ७७६ कोटी ६६ लाखऑगस्ट : महिना पूर्णत: कोरडा२१ दिवसांपेक्षा अधिक खंड : २५० मंडळांत

किती दिवस पाऊस : १२२ पैकी ४० दिवसआठ जिल्ह्यात किती पाऊस? : ८५.५ टक्केकिती पावसाची तूट : १५ टक्केवार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी.किती पाऊस झाला? : ५८१.५ मिमी.मागील वर्षीचा पाऊस : ७६९.७ मिमी. (११३ टक्के)

विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरीजिल्हा..........अर्जदार शेतकरीछत्रपती संभाजीनगर : ११५०८४४जालना : १०१५९३२बीड : १८५०५५२लातूर : ८६३०१७धाराशिव : ७५७७७१नांदेड : ११९७७४४परभणी : ७६३०७६हिंगोली : ५१२४४७एकूण : ८१११३७४

काय म्हणाले विभागीय आयुक्त ?मराठवाड्यात २५० मंडळांत पावसाचा खंड होता. तेथे २५ टक्के अग्रीम विम्याची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. परंतु प्रीमियम न भरल्याची, उत्पादन, मंडळनिहाय पावसाचे निकषांची अडचण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. शासन यामध्ये निर्णय घेईल.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या कंपन्यांकडे जबाबदारी?छत्रपती संभाजीनगर : चाेलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं.लि., जालना : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि., बीड : भारतीय कृषी विमा कंपनी, लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि., धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि., परभणी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि., नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., हिंगोली : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपन्यांकडे विमा रक्कम देण्याची जबाबदारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र