शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० टक्क्यांचा परतावा, ४ हजार देऊन ठेकेदाराला ३० लाखांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:49 IST

कंपनीचे व्यवस्थापक सांगून महिलेने महिनाभर केला संपर्क, पैसे परत मागताच कॉल बंद

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केट मध्ये दिवसाला १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेकेदार शेख मोहम्मद अब्दुल साजीद (६०) यांना सायबर गुन्हेगारांनी अवघ्या तीस दिवसांत ३० लाख ५७ हजारांना लुटले. यासाठी सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचा वापर केला. तिला कंपनीचे व्यवस्थापक सांगून अब्दुल साजीद यांना जाळ्यात अडकवले. जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यू ट्यूबवर सर्फिंग करत असताना अब्दुल साजीद यांना आयसीआय सिक्युरिटीज ग्रुपची शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबाबत जाहिरात दिसली. जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे त्यांनी संपर्क केल्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांना विनिता पटोदिया नावाने एका महिलेने संपर्क केला. लिंक पाठवून ॲप इंस्टॉल करण्यासाठी सांगितले. केवायसी डिटेल्स भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना त्या ॲपवर त्यांचे डीमॅट खाते उघडल्याचे भासवण्यात आले. व्हॉट्सॲप ग्रुपवर कंपनीचा प्रमुख सांगणाऱ्या अश्विन पारेखने, कोणाला कसा किती फायदा झाला, असे मेसेज टाकून अब्दुल साजीद यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. विनिता हिने वारंवार संपर्क सुरू केला. ४ मार्च रोजी त्यांच्या सांगण्यानुसार अब्दुल यांनी ५० हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर ६ मार्च रोजी १० लाख रुपये पाठवले.

दिवसाला १० ते १५ टक्के परताव्याचे आमिषअब्दुल साजीद पाठवत असलेली रक्कम सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या बनावट ॲपवर दिसत असल्याने त्यांचा विश्वास बसत गेला. त्यानंतर त्यांनी आणखी २० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले. २४ मार्चनंतर ही सर्व रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी विनिताला विनंती केली. मात्र, त्यांना आणखी २१ लाख रुपये भरल्यानंतरच परतावा मिळण्याची अट घातली गेली.

४ हजार देऊन ३० लाखांना लुटले४ मार्च रोजी अब्दुल साजिद यांनी पहिल्यांदा ५० हजार रुपये गुंतवले. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी त्यांना परताव्यात चोवीस तासांत ५४ हजार ८०० रुपये परत केले. त्यानंतर त्यांचा विश्वास बसत गेला. २४ मार्चपर्यंत ते एकूण ३० लाख ५७ हजार ६०० रुपये सायबर गुन्हेगारांना देऊन बसले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी