शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बस-कार अपघातात १० प्रवाशी गंभीर

By admin | Updated: April 6, 2016 00:50 IST

तामलवाडी : भरधाव वेगातील बसने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात

तामलवाडी : भरधाव वेगातील बसने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील माळुंब्रा शिवारात मंगळवारी सकाळी घडला़ अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली़ अपघातातील जखमींना उपचारासाठी तुळजापूर, सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील माळुंब्रा शिवारात मंगळवारी सकाळी सोलापूरकडे जाणाऱ्या बसने (क्ऱएम़एच़२०- बी़आय़२१८५) तुळजापूरकडे निघालेल्या कारला (क्ऱएम़एच़४२- के़ ३५०९) जोराची धडक दिली़ या भीषण अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जावून पडली़ अपघातात कारमधील पाचजण तर बसमधील पाच जण गंभीर जखमी झाले़ अपघातानंतर सांगवी मार्डी, माळुंब्रा येथील तरुणांनी घटनास्थळी दाखल झालेल्या तामलवाडी पोलिसांबसोबत मिळून वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना व भाविकांना बाहेर काढले़ या अपघातात विनोद विश्वनाथ जगताप (वय-५२), प्रिया शशिधर पाडे (२२), सितादेवी शशिधर पाडे (वय-४५ सर्व रा़ बारामती जि़पुणे), सिध्दार्थ पाडे (वय-५५), बसचालक अनिल भगवान बारकूल (वय-४८), प्रतिभा कदम (वय-३० रा़तुळजापूर), प्रकाश रामचंद्र कदम (वय-५६ रा़तुळजापूर) यांच्यासह दहा जण जखमी झाले़ जखमींना तुळजापूर, सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़दरम्यान, एसटी आणि कारच्या धडकेनंतर एसटी रस्त्यालगतच्या दहाफूट खोल खोदलेल्या चारीमध्ये पडली. एसटीतील अनेकांना किरकोळ मार लागला असून, ३० ते ४० प्रवाशांनी संकटकालीन खिडकीतून बाहेर येण्यासाठी मार्ग काढला. अपघातानंतर महिला व पुरुष प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. तसेच कारमधील प्रवाशी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.चारी खोदाईमुळे अपघातराष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे़ मात्र, माळुंब्रा शिवारात सुरू असलेल्या कामाबाबतचे सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत़ एका बाजूच्या रस्त्याचे काम झाले असून, जुन्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी चारी खोदण्यात आली आहे़ त्यामुळे वाहनांना एकमेकांना साईड देता येत नाही़ वाहन थोडेही खाली गेले तर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, आजचा अपघातही या खोदण्यात आलेल्या चारीमुळे झाल्याचे दिसत आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)