शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संकटग्रस्त बालकांसाठी ‘१०९८’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:20 IST

कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.

ठळक मुद्देत्वरित मदत : चाईल्ड हेल्पलाईनवर औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज ४० ते ५० फोन कॉल्स; स्वयंसेवक धावताहेत मदतीला

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.जन्माला आलेल्या, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे; मात्र आपल्या समाजात बालकांच्या प्रश्नाकडे आजही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक बालकांना घरातच अत्याचार सहन करावा लागत आहे. काही बाळांना भूल देऊन भिकारी त्यांचा भावनिक वापर करून घेत आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांच्याही समस्या आहेत. अनेकदा मूल घरचा रस्ता विसरतात, हरवतात. संकटात सापडतात, कोण्या बालकाचा अपघात झाला आहे, अशा संकटाच्या वेळी त्या संकटग्रस्त बालकांनी किंवा पालक, नातेवाईक वा घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कोणीही १०९८ या नंबरवर फोन केला, तर त्या मुलाला त्वरित मदत मिळू शकते. यासाठी जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईनची सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात चाईल्ड लाईन सुरू करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र समन्वयक, समुपदेशक, सदस्य, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे.मागील ११ मेपासून चाईल्ड लाईनची सुरुवात झाली असून, दररोज जिल्ह्यातून ४० ते ५० कॉल्स येत असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी दिली.२४ तास सुरू चाईल्ड हेल्पलाईन० ते १८ वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असते. काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाºया मुलांसाठीही संस्था काम करते. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संस्थेतर्फे तातडीने मदत पुरविण्यात येते. महिला आणि बालविकास या केंद्रीय मंत्रालयाचा चाईल्ड लाईनला आधार आहे. चाईल्ड लाईन हे राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेली असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांनी दिली.शाळांमधून करणार जनजागृतीएमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनचे कार्य व १०९८ हा टोल फ्री फोननंबरची माहिती देण्यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक